मुंबई | राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून औरंगजेबाची कबर ५ दिवस बंद ठेवली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अजित पवारांनी आज (१९ मे) पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना होते. औरंगजेब कबरी ही पुढील पाच दिवस पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय पुरातत्व विभागाचे अधीक्षक मचाले यांनी एका पत्रातून आदेश दिले आहे. गेल्या आठवड्या एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगबादमध्ये सभा झाली होती.
त्यावेळी ओवेसींनी औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतले होते. त्यावरून ओवेसींवर राज्याच्या राजकारणातून टीकेची झोड उठली होती. औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेऊन प्रार्थना करणे हा इस्लामच भाग असल्याचा दावा एमआयएमकडून केला होता. या पार्श्वभूमीवर पुढील पाच दिवसांसाठी औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेण्यासाठी बंद केले आहे.
दरम्यान, ओवेसींनी दर्शन घेतल्यानंतर मनसे म्हटले की, औरंगजेबाची कबर उखडून फेकण्याची आहे, अशी खळबळजनक मागणी केली होती. तर भाजप यांनी महाविकासआघाडीवर निशाणा साधला होता. यानंतर औरंगजेबच्या कबरीचे दर्शनवरून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेणे चुकीचे असून या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे स्पष्ट केले होते. या प्रकरणानंतर औरंगजेब कबरीच्या येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले होते. यामुळे औरंगजेबने कबर पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घतला आहे.
The tomb of Mughal emperor Aurangzeb will remain closed for 5 days to ensure that the law and order situation in the state does not get affected: Maharashtra Deputy CM Ajit Pawar pic.twitter.com/rSFn2Jfzh9
— ANI (@ANI) May 19, 2022
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.