HW News Marathi
महाराष्ट्र

जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद – ॲड. यशोमती ठाकूर

क्ष। गावात दर्जेदार शैक्षणिक सुविधा, उत्कृष्ट शालेय इमारती, वर्गखोल्या, प्राथमिक आरोग्य सुविधा, तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांनी सुसज्ज रुग्णालये यासह इतर भौतिक सुविधा, अद्ययावत व्यायामशाळा, परिसराचे सौंदर्यीकरण, सभागृहे, विश्रामगृहे, ग्रामपंचायत इमारती आदींची निर्मिती करतांना जिल्ह्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी काल (३० जानेवारी) दिली.

विविध योजनेअंतर्गत 17 कोटी 85 लक्ष रुपये प्राप्त निधीतून मोर्शी तालुक्यातील गावांमध्ये विकासकामांचे भूमिपूजन ठाकूर यांनी केले. गावात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधांची निर्मिती करावी.

गावातील नागरीकांच्या सुविधेसाठी कामे गतीने पूर्ण करावी असे निर्देश त्यांनी संबंधिताना दिले. मोर्शी तालुक्याचे उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, तहसीलदार सागर ढवळे आदी उपस्थित यावेळी होते.

मोर्शी तालुक्यातील राजुरवाडी येथे 1 कोटी रुपये प्रमाणे प्राप्त निधीतून तळणी पिंपळखुटा रस्त्यावर 2 लहान पुलाच्या कामांचे भूमीपुजन, जिल्हा वार्षिक योजनेतुन प्राप्त सुमारे 60 लक्ष रुपयांच्या निधीतून पशुवैद्यकीय दवाखाण्याचे बांधकाम व वॉर्ड क्रमांक 1 ते 2 मधील बाबाराव टेकाम ते सुधाकर उईके यांच्या घरापर्यंतचे 10 लक्ष रुपयांच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या रस्त्याचे लोकार्पण,10 लक्ष रुपयांच्या निधीतून मुस्लिम कब्रस्तानचे बांधकाम व सौंदर्यकरणचे भूमिपूजन ठाकूर यांनी केले. यावेळी सरपंच पल्लवी मानकर, उपसरपंच पद्मताई डोळस आदी उपस्थित होते.

मोर्शी तालुक्यातील शिरलस येथे 10 लक्ष रुपये निधीतून ग्रामपंचायत भवनाचे व राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत नागरी सुविधा केंद्राचे लोकार्पण, 8 लक्ष रुपयांच्या निधीतून व्यायाम शाळेचे लोकार्पण, शाळा वर्ग खोली दुरुस्तीचे लोकार्पण त्यांनी केले. यावेळी सरपंच निपेश चौधरी, उपसरपंच अमोल देशमुख, सदस्य रमेश काळे, सुरेंद्र राहते, कमला तायडे, रेणुका टेकाम, अभय आठवले उपस्थित होते

नेरपिंगळाई-लिहीदा-नया वाठोडा-पिंपळखुटा-पाडी कि.मी.0/00 ते 9/500 मध्ये सुधारणेच्या 4 कोटी 25 लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे भुमीपुजन ठाकूर यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

News Desk

कमला मिलमधील पबच्या आगीत होरपळून मुत्यू झालेल्या १४ मुंबईकरांना न्याय द्या, शेलारांचे मुख्यमंत्र्याना पत्र

News Desk

एसटी कर्मचाऱ्यांचे अजून किती बळी सरकारला हवेत? दरेकरांचा ठाकरे सरकारला सवाल

News Desk