HW News Marathi
महाराष्ट्र

अखेर हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली; ‘या’ तारखेला मुंबईत होणार अधिवेशन

मुंबई | विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ रोजी मुंबईत होणार आहे. हिवाळी अधिवेशन फक्त एक आठवड्याचे निश्चित झाले आहे. विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समिती २४ डिसेंबरला अधिवेशनासंदर्भात निर्णय घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. विधानभवनात आज (२९ नोव्हेंबर) बैठकीचे आयोजित करण्यात आली होती.

अधिवेशनाचा कालावधी कमी असल्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोणत्या संसदीय कामकाजात या सरकारला रस नसल्याचा आरोप फडणवीसांनी केली आहे. तसेच मार्च महिन्यातील अधिवेशन नागपूरात करू, असे आश्वासन सरकारने दिल्याची माहिती फडणवीसांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.

बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री ॲड्. अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अधिवेसनात कोविड-१९ नियमाचे पालन

अधिवेशन कालावधीत लसीकरण पूर्ण म्हणजे ‌कोविड-१९प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्यांनाच प्रवेश तसेच आरटीपीसीआर चाचणी देखील अनिवार्य करण्यात आले आहे. दर आठवड्याला ही चाचणी होणार आहे. मंत्री, राज्यमंत्री यांच्या सोबत केवळ एकाच अधिकाऱ्याला प्रवेश दिला जाणार असून विधानमंडळ सदस्यांचे स्वीय, सहायक, वाहनचालकांसाठी विधान भवनाच्या बाहेरील प्रांगणात स्वतंत्र व्यवस्था राहणार आहे. या काळात खासगी व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही. या बैठकीत कामकाजाचा दिनक्रम, लक्षवेधी, प्रश्नोत्तरे आदींबाबत चर्चा झाली.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तर मी मुंबई कायमची सोडून जाईन,कंगणाचं गृहमंत्री अनिल देशमुखांना चॅलेंज

News Desk

“स्वत:चा राजकीय अजेंडा महत्त्वाचा मानू नका” दिलीप-वळसे पाटलांचा मनसेला टोला

News Desk

सरकारनं सात-बारा कोरा करण्याचा शब्द पाळला नाही – विखे पाटील

News Desk