HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

“…तर आर्थर रोड जेल हे नवीन मातोश्री होऊ शकतं”, निलेश राणेंचा प्रहार 

मुंबई | महाविकासआघाडीचे सरकार सध्या मोठ्या अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. सचिन वाझे प्रकरणारुन राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सरकारला धारेवर धरले आहे. या सगळ्या मुद्यावरुन राणे बंधुंनी तर ठाकरे सरकारवर आणि वैयक्तिकरित्या उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. पुन्हा एकदा भाजपचे नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

“ज्या अर्थाने शिवसेना परमवीर सिंग यांच्या बदलीची आणि त्या अगोदर वाझे यांची बाजू घेत होती असं वाटतं मातोश्रीसाठी सगळे दोन नंबरचे धंदे करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. हे दोन अधिकारी खरं बोलले तर आर्थर रोड जेल हे नवीन मातोश्री होऊ शकतं”, अशी गंभीर टीका निलेश राणे यांनी केली आहे. याआधीही निलेश राणे यांनी ठाकरे कुटुंबीयांवर वैयक्तिक टीका केलेली पाहायला मिळाली आहे. इतकचं नाही तर ठाकरे आणि राणे कुटुंबाचा वाद सगळ्यांनाच माहित आहे.

मनसुख हिरेन हत्येप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे सध्या अडचणीत सापडले आहेत. तसेच, राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपने या मुद्यावरुन सरकारला चांगलेच कोंडीत पकडले आहे. यावरुनच भाजप नेते निलेश राणे यांनीही मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे लादेन आहे का? असा सवाल करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठे आहे? असा सवाल करतानाच मुख्यमंत्रीच जर अशा अधिकाऱ्यांची बाजू घेत असतील तर त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी केली होती.

 

Related posts

धान्यवाटप विनातक्रार होण्यासाठी पालकमंत्र्यांनी व्यक्तीश: लक्ष घालून जबाबदारी घ्यावी

News Desk

एक जबाबदार विरोधी पक्ष नेते म्हणून मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधणं योग्य

News Desk

“मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच…”, बहिण पंकजाला कोरोना भाऊ धनंजय मुंडेची भावनिक पोस्ट

News Desk