HW News Marathi
महाराष्ट्र

…तर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, पंकजा मुंडेंचं सुचक वक्तव्य

मंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले. त्यानंतर घडलेल्या राजकीय गदारोळानंतर अखेर राठोडांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यास मंत्री धनंजय मुंडे यांच्या रेणू शर्मा प्रकरणावरुन राजकीय वातानरण पुन्हा तापण्याची शक्यता दिसून येत आहे.

आपण राज्याला पुरोगामी महाराष्ट्र म्हणवतो आणि या राज्यात पुढच्या पिढीसाठी जी उदाहरणं नेत्यांकडून प्रस्थापित केली जात आहेत ती दुर्दैवी आहेत. फक्त आणि फक्त सरकार, युती टीकवण्यासाठी चुकीच्या गोष्टींना पाठीशी घातलं जात आहे असा नाराजीचा सूर आळवत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी प्रतिक्रिया दिली. मुंबईत एका पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

“जर कोणावर अशा प्रकारचं बोट दाखवलं गेलंय. त्यांनीच स्वतःची भूमिका ही स्वतःहून घेतली पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे. मग राजकीय जीवनामध्ये लोक त्यांच्याकडे मान उंचावून बघतील. व्यक्तिगतही मी या गोष्टीचं कधीच समर्थन करू शकत नाही. ज्यांच्यावर आरोप होतात, त्यांनीच भूमिका घ्यायला हवी”, असंही भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

वनमंत्री संजय राठोड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला खरा, पण सदर प्रकरणात राजीनामा देण्यात दिरंगाई झाल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. शिवाय यावेळी त्यांनी सध्याच्या प्रसंगाची पार्श्वभूमी आणि संदर्भ घेत धनंजय मुंडे यांच्यावरही काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या काही गंभीर आरोपांच्या धर्तीवर त्यांच्याही राजीनाम्याची मागणी केली आहे.

पूजा चव्हाण प्रकरणात तपास यंत्रणांनी अत्यंत नि:पक्षपातीपणे तपास करणं आणि वेगानं तपास करणं आवश्यक असल्याचं म्हणत जात, धर्माच्या पलीकडे जाऊन या गोष्टींचा तपास योग्य आणि अपेक्षित त्या मार्गानं होण्यासाठी त्या आग्रही दिसल्या. सोबतच सदर प्रकरणी पूजा चव्हाणची ओळख जाहीरपणे सर्वांसमोर आणली गेल्याबाबतही त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शिवसेनेत असताना गडकरींना माहित न्हवतं का?”, नाना पटोलेंचा गडकरींना सवाल

News Desk

वरूण सरदेसाई म्हणजे ‘रडू बाई रडू, कोपऱ्यात बसू’ मनसेची टीका !

Gauri Tilekar

अधिकची मदत मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार- पालकमंत्री छगन भुजबळ

News Desk