मुंबई | उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल, असे तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. मग जर तसे असेल तर ह्यापुढे महाराष्ट्रात येता नाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलीसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हे ही आदित्यनाथ ह्यांनी लक्षात ठेवावे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकाद्वारे योगी आदित्यनाथ यांना लगावला आहे.
#महाराष्ट्रधर्म #InterStateMigrantWorkmenAct pic.twitter.com/cfWRKT8CiG
— Raj Thackeray (@RajThackeray) May 25, 2020
तसेच महाराष्ट्र राज्य सरकारनेही ह्या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. ह्यापुढे कामगार आतमध्ये आणताना त्यांची नोंद करावी आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे फोटो आणि त्यांची ओळख असली पाहिजे तरच महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रवेश द्यावा हा कटाक्ष महाराष्ट्राने पाळावा, असे या पत्रकार म्हटले आहे.
अपने घर पहुँच रहे सभी बहनों भाइयों का प्रदेश में पूरा ख्याल रखा जायेगा।अपनी कर्मभूमि को छोड़ने के लिए मजबूर करने के बाद उनकी चिंता का नाटक मत कीजिए।
सभी श्रमिक कामगार बंधु आश्वस्त हैं कि अब उनकी जन्मभूमि उनका हमेशा ख्याल रखेगी, शिवसेना और कांग्रेस आश्वस्त रहे..#BJPWithMigrants
— Yogi Adityanath Office (@myogioffice) May 24, 2020
“आपल्या कर्मभूमीला सोडण्यास भाग पाडल्यानंतर त्यांच्याबद्दल काळजी करण्याचे नाटक करु नका,” असे ट्वीट करत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.योगी आदित्यनाथ ट्वीटमध्ये म्हणाले, “आपल्या घरी पोहोचलेल्या सर्व बंधू-भगिनींची उत्तर प्रदेशात काळजी घेतली जाईल. आपल्या कर्मभूमीला सोडण्यास भाग पाडल्यानंतर त्यांच्याबद्दल काळजी करण्याचे नाटक करु नका. सर्व कामगारांना विश्वास आहे की आता त्यांची जन्मभूमी त्यांची काळजी घेईल, शिवसेना आणि कॉंग्रेस निर्धास्त रहा” असे म्हटले.
संबंधित बातम्या
कर्मभूमीला सोडण्यास भाग पाडल्यानंतर त्यांची काळजी करण्याचे नाटक करु नका !
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.