HW News Marathi
महाराष्ट्र

“… तर फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा”, भाजप नेत्याच वक्तव्य!

मुंबई। राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि विरोधक यांच्यामध्ये वारंवार आरोपांच्या फैरी झडत असतात. आणि या आरोप-प्रत्यारोपांची मालिका शांत होत नाही, तोवरच आता पुन्हा एकदा भाजप नेत्याकडून ठाकरे सरकार मधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरे हे पार्टटाईम मुख्यमंत्री आहेत. ते काय काम करतात हे सर्वांना माहीत आहे. राज्याला पार्टटाईम मुख्यमंत्र्याची गरज नाही. देवेंद्र फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्रीच राज्याला हवा, असं विधान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी यांनी हे वक्तव्य केलं आहे.

राजकारणाचं गुन्हेगारीकरण यांच्या हातचा मळ

मुंबईत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. या बैठकीला मार्गदर्शन करताना सी. टी. रवी यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. आजचा मुख्यमंत्री पार्टटाईम आहे. फुलटाईम नाही. राज्यात फडणवीसांराखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधी उठतात, कधी झोपतात, कधी काम करतात जनतेला सर्व माहीत आहे. या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकारच नाही. राजकारणाचं गुन्हेगारीकरण यांच्या हातचा मळ झाला आहे, अशी विखारी टीका भाजप नेत्याकडून आता करण्यात आली आहे.

त्यांनी केवळ भाजपला धोका दिला

तर या झालेल्या भाजपच्या बैठकीत सी. टी. रवी असंही म्हणाले की, महाराष्ट्राच्या विकासाचे काम होत नाही. राज्यातील जनतेने नरेंद्र आणि देवेंद्रच्या नावाने मतदान केलं होतं. सत्तेतच यायचं असेल विधानसभा विसर्जित करून निवडणुकीला सामोरे जा, आमचं तुम्हाला खुलं आव्हान आहे, असं आव्हान देतानाच 2019मध्ये जनतेने भाजपला मतदान केलं आहे. पण शिवसेनेने लोकांचा कौल झुगारला. त्यांनी केवळ भाजपला धोका दिला नाही तर जनतेला धोका दिला आहे. संधी साधूंच्या सोबत जाऊन सरकार स्थापन केलं आहे. हा मतदारांचा अपमान आहे असंही ते म्हणाले.

नवाब मलिकांचे पुतळे जाळण्याचा आपण कार्यक्रम दिला

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील असंही म्हणाले कालपरवाच नवाब मलिकांचे पुतळे जाळण्याचा आपण कार्यक्रम दिला. आदल्या दिवशी 9 वाजता एका व्हिडीओ कॉलवर आपण हा कार्यक्रम दिला. दुसऱ्या दिवशी 26-27 मोठ्या शहरात आपण नवाब मलिकांचे पुतळे जाळले. अस वादग्रस्त वक्तव्य प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. पुतळा जाळला गेला नाही, अटक केली नाही असं झालं नाही. इतकं कमी वेळात प्लानिंग झालं, असं त्यांनी सांगितलं. तसेच, इंधनावरील व्हॅट कमी करावा म्हणून आपण कार्यक्रम दिला. 400 हून अधिक जिल्हा केंद्र आणि तहसील केंद्रांवर निदर्शने करण्यात आली. निवेदने देण्यात आली, असंही चंद्रकांत पाटील दादरमधल्या या बैठकीत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई, पुण्यातील लोकसंख्या कमी करण्याची गरज – प्रकाश आंबेडकर

News Desk

आदित्य ठाकरेंचं मोठं प्लॅनिंग, नेमकं काय आहे साहसी पर्यटन धोरण?

News Desk

कॅगपासून माहिती लपवलेले ‘ते’ अधिकारी निलंबित, धनंजय मुंडेंची विधानसभेत घोषणा

News Desk