मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देश लॉकडाऊन असताना आता एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात ४०% घट झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज (१७ एप्रिल) झालेल्या पत्रकार परिषदेत ही दिलासादायक माहिती दिली आहे. या वृत्तानंतर आता आपल्या देशाच्या कोरोनाविरुद्धच्या या लढ्याला काहीसे यश मिळत असल्याचे चित्र आहे. देशातला कोरोनाबाधितांचा आकडा सध्या १००७ ने वाढ झाली आहे. त्यामुळे देशात तब्बल १३,३७८ कोरोनाबाधितांची नोंद असून गेल्या २४ तासांमध्ये २३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
We have been witnessing average growth factor at 1.2 since April 1 which stood at 2.1 (average) between March 15- March 31. Hence, there is 40 per cent decline in average growth factor even as we increased #COVID19 testings: Lav Aggarawal, Joint Secretary, Union Health Ministry pic.twitter.com/kQMzIcX1xI
— ANI (@ANI) April 17, 2020
केंद्र आणि राज्य सरकारकडून गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात एप्रिल महिन्यामध्ये कोरोनाबाधितांच्या आकड्यात चांगलीच घट झाली आहे. १५ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत आढळलेल्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत १ एप्रिलपासून अगदी आजपर्यंत आढळलेल्या कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. खरंतर तपासण्यांची संख्या वाढवल्यानंतर कोरोनाबाधितांचा आकडा वाढलेला पाहायला मिळतो. मात्र आधीच्या तुलनेत तपासण्यांची संख्या वाढूनही कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट होणे, हे अत्यंत महत्त्वाचे आणि दिलासादायक आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.