मुंबई। दसरा मेळाव्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर आता आम्हाला उद्धवजींमध्ये राहुल गांधी स्पष्टपणे दिसू लागले आहेत. यामध्ये कोणतीही शंका उरलेली नाही, अशी बोचरी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली. उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात आता फरकच उरलेला नाही, हे मी आत्मविश्वासाने सांगतो, असे ट्विट नितेश राणे यांनी केले. त्यामुळे आता शिवसेनेकडून या टीकेला काय उत्तर दिले जाणार, याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे. ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात राणे कुटुंबीयांवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. आज काहीजण केवळ माझं भाषण संपण्याची वाट पाहत असतील. भाषण कधी थांबतंय आणि कधी एकदा चिरकतोय, अशी काहींची अवस्था आहे. कारण शिवसेना आणि ठाकरे कुटुंबावर टीका करणं, चिरकणं यातून त्यांना रोजगार मिळतो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.
After Dussehra speech..
With full confidence I can say..
Humko uddhavji mein Rahulji ekdum clear dekte hain!!!
Koi doubt nahi!!
— nitesh rane (@NiteshNRane) October 15, 2021
पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्ताला दाखवण्याची वेळ येऊ नये
हा देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे. त्यावेळेला जसा संपूर्ण देश पेटला होता. त्या देशामध्ये महाराष्ट्र लाल, बाल आणि पाल पुढे होता, महाराष्ट्र एक पुढे होता, पंजाब एक पुढे होता आणि पश्चिम बंगाल एक पुढे होता. बंगालनं त्यांचं कर्तृत्व दाखवलेलं आहे. खरोखर ममतादीदी आणि बंगाली जनतेला मी धन्यवाद देतोय. तुम्ही ती न झुकण्याची जिद्द कायम ठेवलेली आहे. तीच जिद्द आपल्यासुद्धा रगामध्ये आणि रक्तामध्ये आहे ही आपल्याला तयारी ठेवावी लागेल. हर हर महादेव म्हणजे काय असतं हे पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्ताला दाखवण्याची वेळ येऊ नये, असं म्हणत त्यांनी एक प्रकारे भाजपला इशारा दिलाय.
हिंदुत्वाला धोका होता तेव्हा एकच मर्द बाळासाहेब ठाकरे
सावरकर शब्द उच्चारण्याची तुमची लायकी तरी आहे का? गांधी हा शब्द उच्चारण्याची लायकी तरी आहे का? गांधी आणि सावरकर तरी समजले का? असा सवाल करतानाच मी दोन वर्षापूर्वी बोललो होतो. माय मरो आणि गाय जगो हे आमचे हिंदुत्व नाही. त्यावेळी गहजब माजला होता. झुंडबळी झुंडबळी अशी बोंब ठोकली. त्यावेळी मोहन भागवत म्हणाले झुंडबळी घेणारे हे हिंदूच नाहीत. मग हे हिंदुत्व आहे तरी काय? कोणी शिकवायचं? कुणाला शिकवायचं? आणि कोणाकडून शिकायचं? हिंदुत्वाला धोका नाही हे सत्य असेल तर हिंदुत्वाला धोका होता तेव्हा एकच मर्द बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाच्या दुश्मनांसमोर उभा राहिला होता, असंही त्यांनी सांगितलं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.