HW News Marathi
महाराष्ट्र

संभाजी भिडे यांच्या विरोधात एकही पुरावा नाही

मुंबई | भिम-कोरेगाव दंगली प्रकरणी संभाजी भिडे यांच्या विरोधात आतापर्यंत केलेल्या चौकशीत एकही पुरावा मिळालेला नाही. या प्रकरणाची चौकशी अजूनही सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना दंगल घडवताना पाहिल्याची तक्रार एका महिलेने केली.

त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेची तक्रार नोंदवून घेतली आणि कारवाई सुरू केली. आतापर्यंत जेवढे पुरावे समोर आले, त्यात संभाजी भिडे यांच्याविरोधात एकही पुरावा सापडलेला नाही. या दंगलीत त्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट होत नाही. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत सांगितले. तसेच संभाजी भिडे यांची चौकशी बंद केले नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदा व सुव्यवस्थेवर चर्चा करताना भिमा-कोरेगाव दंगली प्रकरणी उत्तर देत होते.

सोमवारी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी भिडे यांना अटक करण्यासाठी ‘एल्गार मोर्चा’ काढण्यात आला होता. प्रकाश आंबेडकर यांचे शिष्ट मंडळ मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी गेले होते. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी सरकारला आठ दिवसांत संभाजी भिडे यांना अटक करा नाही तर आम्ही विधानभवनाला घेराव घालू असा इशारा त्यांनी आझात मैदानत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

१ जानेवारी रोजी भिमा-कोरेगाव येथे विजयस्तंभला अभिवादन करण्यासाठी बौध्द अनुयायी गेले होते. यावेळी जमावने अभिवादन करण्यासाठी गेलेल्या लोकांवर हल्ला केला. या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपुर्ण महाराष्ट्रात जातीय दंगल झाली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वंकष आरोग्य निर्देशांक अहवालात महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक

Aprna

नाटक सुरु करण्यासाठी अडचण, कलाकार-दिग्दर्शक राज ठाकरेंच्या भेटीला

News Desk

स्वतःच ठेवायचं झाकून, दुसऱ्याच पहायचं वाकून हे वडेट्टीवारांनी सोडून द्यावं’, नितेश राणे यांची टीका!

News Desk