HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षामध्ये कोणताही गट नाही- खासदार प्रतापराव जाधव

Pratap Rao jadhav

बुलडाणा – महाराष्ट्र मध्ये शिंदे गट किंवा उद्धव ठाकरे गट असा कोणताही शिवसेनेमध्ये नाही. आम्ही शिवसेनेतच आहोत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांच्या विचाराचे आम्ही पाईक आहोत. महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील झाल्याने हिदुत्वापासून शिवसेना दूर जात होती. शिवसेनेची नैसर्गिक युती ही भाजपसोबत आहे. त्या महायुतीमध्ये आम्ही आहोत. अशी प्रतिक्रिया शिदे गटात सहभागी झाल्यानंतर प्रथमच बुलडाणा जिल्ह्यात आल्यानंतर खा. प्रतापराव जाधव यांनी सिंदखेड राजा येथे दिली.( PratapraoJadhav Visits Buldhana)

यावेळी त्यांनी माँसाहेब जिजाऊ यांचे दर्शन घेतले आहे. यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार डॉ.संजय रायमुलकर,माजी आमदार डॉ.शंशिकात खेडेकर,युवासेना सहसचिव तथा जिल्हाप्रमुख ऋषी भाऊ जाधव,उपजिल्हाप्रमुख बाबुराव मोरे,दिपक बोरकर,ता.प्रमुख शिवप्रसाद ठाकरे,नगराध्यक्ष सतिष तायडे,जि.प.सदस्य पती धनराज शिंपणे,सिंदखेडराजा नगरपालिकेचे सर्व नगरसेवक,प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रातील मोदी सरकारच्या हातात देश सुरक्षित नाही!, संजय राऊतांच मोठं विधान

News Desk

येवला शहरातील शिवसृष्टी प्रकल्पाच्या जागेची पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पाहणी

Aprna

“…सत्तेशिवाय समोरासमोर या”, संजय राऊतांचे शिंदे गटाला आव्हान

Aprna