HW News Marathi
महाराष्ट्र

खडसेंवर अन्याय होणार नाही, तिसऱ्या यादीत त्यांचे समाधान होणार !

जळगाव | “खडसेंवर अन्याय होणार नाही, तिसऱ्या यादीत एकनाथ खडसे यांचे समाधान होणार,” असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व्यक्त केला आहे. खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही,अशी प्रतिक्रिया महाजन यांनी प्रसार माध्यमांशी जामनेरमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना दिली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या दोन यादी जाहीर झाल्या आहेत.

भाजपच्या दोन्ही यादीमध्ये भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात उमेदवारीवरून उलट सुलट चर्चा होऊ लागल्या. पक्षाने खडसेंना उमेदवारी दिली नाही तरी देखील त्यांनी भाजपच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जळगावमधून भाजप सेनेत युतीचा ६-५ असा फॉर्म्युला ठरल्याचे बोलले जात आहे. असे असेल तर भाजपच्या ६ मतदारसंघात उमेदवार जाहीर झाले असून खडसे यांचा पत्ता कापल्याचे स्पष्ट झाले आहे. मुक्ताईनगर हा मतदारसंघ युतीच्या नव्या फॉर्म्युल्यात सेनेला सुटल्याचे संकेत मिळाले आहेत. येथून सेनेकडून चंद्रकांत पाटील उमेदवार असतील.

मुक्ताईनगर मतदारसंघातून १९९० पासून खडसे सलग ६ वेळा निवडून आले. युतीच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. त्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी पार पाडल्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत ते मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात त्यांच्याकडे महसूलसह अनेक प्रमुख खाती सोपविण्यात आली होती. मात्र, फडणवीस आणि त्यांच्यात वाद वाढत गेला. भोसरी येथील एका जमीन व्यवहाराच्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर, त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी पक्षात पुनर्वसनाची मागणी अनेकदा केली. मात्र, पक्षश्रेष्ठींनी त्यांना बाजूलाच ठेवले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी रासप नेते रत्नाकर गुट्टेंना अटक

News Desk

दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून वेगळा विचार सुरू !

News Desk

नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजीत तांबे विजयी

Aprna