HW News Marathi
Covid-19

आता राज्यात लाॅकडाऊन नाहीचं! अनलाॅक करण्यावरचं भर- राजेश टोपे

पुणे | लाॅकडाऊनचे ४ टप्पे झाल्यानंतर देश आणि महाराष्ट्र अनलाॅक करायला सुरूवात झाली आहे. मात्र आता पुन्हा रूग्ण वाढल्यानंतर लाॅकडाऊन होणार का ? असा प्रश्न सतत सर्वांना पडत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या प्रश्नाचे उत्तर देत ‘पुन्हाएकदा लॉकडाउन होणार नाही तर आताअनलॉक असेल’ असे स्पष्टीकरण देत पुन्हा लॉकडाउन होणार असल्याच्या चर्चेवर पडदा टाकला. पण या दरम्यान एक फाॅर्म्युला त्यांनी पाहायला सांगितला आहे, करोनाची लस येत नाही तोवर राज्यातील जनतेला सुरक्षित वावर, मास्कआणि सॅनिटायजेशन याएसएमएसप्रणालीचा अवलंब करूनच साधारण आयुष्य जगावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

पुणे आणि सोलापूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राजेश टोपे यांच्या उपस्थितीत लोकप्रतिनिधींची बैठक शुक्रवारी पुण्यात पार पडली. बैठक झाल्यानंतर टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधताना लॉकडाउन होणार नसल्याचे सांगितले. ‘पुणे, मुंबई आणि करोनाचा प्रादुर्भाव वाढत असलेल्या ठिकाणी जुलैमहिन्यांपर्यंत पुरतील इतक्या बेडची सुविधा आहे. जुलैत आढावा घेऊन पुढील तयारी करण्यात येईल. सध्या करोनाची वाढत चाललेलीसंख्या हा चिंतेचा विषय नसून, मृत्यूदर कमी करणे, यावर आम्ही अधिक भर देत आहोत. मुंबई आणि पुण्यात दर एक लाख संख्येमागेहोणाऱ्या चाचण्यांची संख्या देशामध्ये सर्वाधिक असल्याने चाचण्या कमी होत आहेत, या आरोपांमध्ये तथ्य नाही. मृत्यूचे आकडे काहीप्रमाणात पुढे मागे होत असले तरी सरकारने कोणतीही आकडेवारी लपवलेली नाही. विरोधकांनी मागणी केल्यास त्यांना आकडेवारीदिली जाईल,’ असे टोपे यांनी सांगितले.

तर खाजगी रूग्णालयांवर कारवाई केली जाईल !

खाजगी रूग्णालयांमध्ये अनेक ठिकाणी कोरोना रूग्णांवरील उपचारासाठी लाखो रूपये आकारले जात आहेत. राजेश टोपे म्हणाले, रुग्णावरील उपचारांसाठी किती दर आकारावेत यासंबंधी खासगी रुग्णालयांना यापूर्वीच सूचना देण्यात आल्या आहेत. तरीही पुणे, मुंबई, सोलापूर अशा ठिकाणी काहीखासगी रुग्णालये जादा दर आकारत असल्याचे आढळून आले आहे. सरकारने ठरवून दिलेल्या दरांनुसार दर आकारले नाहीत तरसंबंधित रुग्णांलयांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा टोपे यांनी दिला आहे. रुग्णालयांकडून जादाचे दर आकारले जातअसतील तर अशा घटना निदर्शनास आणून द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागपूरमध्ये २१ मार्चपर्यंत लॉकडाऊन, पालकमंत्री नितिन राऊत यांची घोषणा

News Desk

महाराष्ट्रातही सर्वांनी कोरोनाची लस मोफतच ! ही घोषणा करत मालिकांची भाजपवर टीका

News Desk

अशोक चव्हाण यांच्यावर पुढील उपचार मुंबईत होणार

News Desk