HW News Marathi
महाराष्ट्र

“गृहमंत्र्यांवर होणारे हे आरोप मनाला न पटणारे”, IPS अधिकारी कृष्ण प्रकाश यांची प्रतिक्रिया  

पुणे | महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एपीआय सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रुपयांचं टार्गेट दिलं असेल काय?, असा प्रश्न पत्रकारांनी आयपीएस अधिकारी तथा पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना विचारला होता. त्यावर त्यांनी बेधडकपणे उत्तर देत गृहमंत्र्यांवर होणारे हे आरोप मनाला न पटणारे आहेत, असं म्हणत आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं सांगितलं आहे.

गृहमंत्र्यांवर होणारे आरोप मनाला न पटणारेमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले. त्यामध्ये वाझेंना १०० कोटी रुपयांचं दर महिन्याला टार्गेट दिलं होतं, या दाव्याने महाराष्ट्राचं पोलिस दल तसंच राजकीय वर्तुळही हादरलं. हाच प्रश्न आयपीएस कृष्णप्रकाश यांना विचारला असता हे मनाला न पटणारे आरोप असल्याचं त्यांनी सांगितलं. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलयात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.चुकीचं काम करणाऱ्यांना टार्गेट दिलं जातं

राज्याचा गृहमंत्री एका एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्याला १०० कोटी रुपयांचं टार्गेट देईल, ही गोष्ट मनाला पटत नाही. चुकीचं काम करणाऱ्यांना टार्गेट दिलं जातं. पिंपरी चिंचवडला भयमुक्त करणं हे आमचं टार्गेट आहे, असं कृष्णप्रकाश यांनी सांगितलं आहे.

ते पत्र व्हायरल, मी त्याच्यावर बोलणार नाही

पिंपरी चिंचवडला भयमुक्त करणं हे आमचं टार्गेट आहे. पिंपरी चिंचवड शहरातील अवैध धंद्यातून वसुलीसंदर्भातलं पत्र व्हायरल झाले. त्या संबंधित प्रकरणाचा तपास सीआयडीकडे आहे. त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणार नाही, असं कृष्णप्रकाश म्हणाले.

शहरात कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही

शहरात कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही. गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा असो… तो सरकारचा समर्थक असो वा विरोधातला, त्याच्याशी पोलिसांचा संबंध नाही. कारण गुन्हेगार हा फक्त गुन्हेगार असतो, त्याने केलेल्या चुकीचं शासन त्याला होईल, असंही कृष्णप्रकाश म्हणाले.

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रात काय लिहिले आहे?

>> मार्चच्या मध्यावर वर्षा बंगल्यावर परमबीर सिंग मुख्यमंत्र्यांना भेटायला गेल्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे. तेथे परमबीर सिंग यांनी अँटिलिया स्फोटके प्रकरणाची सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कारभाराबद्दलही आपण मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्याचे सिंग यांनी लिहिले आहे.

>> इतकेच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देशमुखांनी चुकीची माहिती दिल्याचे सिंग लिहितात. मात्र तिथे उपस्थित असलेल्या इतर मंत्र्यांना देशमुखांबाबत ही माहिती आधीच होती असे आपल्या लक्षात आल्यातेही ते लिहितात.

>> सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिटचे प्रमुख होतेत. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री देशमुख यांनी अनेकदा वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वरी या निवासस्थानी बोलवले. तेथे त्यांनी त्यांना दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करण्यास सांगितले, असा गंभीर आरोप सिंग यांनी पत्रात केला आहे.

>> देशमुख यांनी वाझेंना फेब्रुवारीच्या मध्यावर ज्ञानेश्वरीवर बोलवून १०० कोटी रुपये गोळा करणयाची सूचना केली. त्यावेळी गृहमंत्र्यांचे खासगी सचिव पलांडे हे देखील हजर होते. तसेच घरातील काही कर्मचारीही उपस्थित होते.

>> यावेळी देशमुख यांनी सचिन वाझे यांना हे शंभर कोटी रुपये गोळा करण्यासाठी काय करायचे हेही सांगितले. मुंबईत १ हजार ७५० बार आणि रेस्टॉरंट्स आहेत. यांमधील प्रत्येकाकडून दोन ते तीन लाख रुपये गोळा केल्यास महिन्याला चाळीस ते पन्नास कोटी रुपये सहज उपलब्ध होतील, असे देशमुख म्हणाल्याचे सिंग लिहितात. उर्वरित रक्कम इतर ठिकाणांहून जमा करता येईल, असेही देशमुख म्हणाल्याचे सिंग यांनी लिहिले आहे.

>> त्यानंतर सचिन वाझे त्याच दिवशी माझ्या कार्यालयात गाठत देशमुखांनी केलेल्या मागणीबद्दल त्यांनी परमबीर सिंग यांना माहिती दिल्याचे सिंग लिहितात. हे ऐकून आपल्याला धक्का बसल्याचे ते लिहितात. ही परिस्थिती कशी हाताळता येईल या आपण विचार करत होतो,असेही त्यांनी लिहिले आहे.

>> गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवंसापूर्वी समाज सेवा विभागाचे एसीपी संजय पाटील यांना आपल्या शासकीय निवास्थानी बोलवले आणि हुक्का पार्लर विषयी चर्चा केली. यावेळी इतर अधिकारी आणि गृहमंत्र्यांचे पीए पलांदे उपस्थित होते.

>> त्यानंतर दोनच दिवसांनी एसीपी संजय पाटील आणि डीसीपी भुजबळ यांना गृहमंत्र्यांच्या निवास्थानी बैठकीसाठी बोलवण्यात आले. पाटील आणि भुजबळ यांना अनिल देशमुख यांच्या घराबाहेर थांबा असे सांगण्यात आले. त्यावेळी पलांदे आत होते. पलांदे यांनी अनिल देशमुख यांच्या केबिनमधून बाहेर आल्यानंतर

>> मुंबईतील १ हजार ७५० बार आणि रेस्टॉरंट्समधून ४० ते ५० कोटी रुपये जमा होतील, असे पलांदे देशमुख यांच्या केबिनबाहेर येत म्हणाले. संजय पाटील यांनीच आपल्याला ही माहिती दिल्याचे सिंग यांनी लिहिले आहे.

>> गृहमंत्री देशमुख आपल्याला पूर्वकल्पना न देताच माझ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानी बोलवत असत, माझ्या अधिकाऱ्यांना वाट पाहायला लावत असत, त्यांचे पीएस पलांडे हे मध्यस्थी करत असत.

>> अनेक प्रकरणांमधील चौकशी आणि तपासात गृहमंत्र्याकडून राजकीय हस्तक्षेप झाला. या मुळे मुंबई पोलिसांना सर्वोच्च न्यायालय आणि हायकोर्टाकडून बदनामी झेलावी लागली.

>> मोहन डेलकर यांनी आत्महत्या मुंबईत केली असली तरी देखील त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याच्या घटना दादरा-नगर हवेली इथ घडल्या. म्हणून त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची चौकशी दादरा, नगर हवेली पोलिसांनी करायला पाहिजे. कायदेशीर बाजू तपासल्यानंतर मी या मतावर आलो होतो. मात्र त्यावर अनिल देशमुखांनी मुंबईतच आत्महत्येसाठी प्रवृत्त झाल्याचा गुन्हा दाखल करायसाठी दबाव टाकला. डेलकर आत्महत्या प्रकरणात विधानसभेत एसआयटीची घोषणा केली, असे सिंग यांनी नमूद केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेचा आणखी एक नेता ईडीच्या रडारवर

News Desk

खडसेंवर अन्याय होणार नाही, तिसऱ्या यादीत त्यांचे समाधान होणार !

News Desk

भाजप नेत्यांच्या गळतीला थांबवण्यासाठी आता फडणवीस उतरणार रिंगणात

News Desk