HW News Marathi
महाराष्ट्र

जिल्हा बँक निवडणुकीत तिसऱ्यांदा पराभव; राजन तेलींचा भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

सिंधुदुर्ग | सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे ज्या सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीकडे लक्ष लागले होते, त्याचा निकाल स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीत राणे कुटुंबियांनी बाजी मारली आहे. या निकालांमध्ये भाजप पुरस्कृत सिद्धिविनायक सहकार पॅनेलने ११ जागा जिंकून सत्ता मिळवली आहे. तर शिवसेना आणि महाविकास आघाडीला ८ जागांवर समाधान मानावे लागले आहे. मात्र, भाजपचे पॅनल निवडून आले असले तरी भाजपच्या १९ पैकी १९ जागा न मिळाल्याने भाजपा जिल्हाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते राजन तेली यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

राजन तेली यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून यापुढे भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याची घोषणा राजन तेली यांनी केली. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपनं झेंडा रोवला आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांचं वर्चस्व पणाला लागलं होतं. परंतु, अनेक दिग्गजांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत भाजपने जिल्हा बँकेवर सत्ता मिळवली असली तरी राजन तेली यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.

शिवसेना विरुद्ध नारायण राणे हा जसा संघर्षा आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्गात नारायण राणे विरुद्ध वैभव नाईक यांच्यातील वादाचा सुद्धा मोठा इतिहास आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांनी नारायण राणेंचा पराभव केल्यामुळे त्यांचा संघर्षाला सुरुवात झाली आहे. तर राजन तेली हे नारायण राणेंच समर्थक मानले जातात. तसेच राणेंच्या समर्थकांचा पराभव करत वैभव नाईकांनी पुन्हा एकदा राणेंना धक्का दिल्याचे म्हटले जाते. दरम्यान, राजन तेलींचा जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये हा तिसरा पराभव आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडेंनी कार्यक्रमात सांगितली राजाची गोष्ट, म्हणाले ‘देव करतो, ते भल्यासाठीच करतो!’

News Desk

पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची लगबग

News Desk

शरद पवारांनी फडणवीसांना सत्तेचा मंत्र नक्की दिला असेल, राऊतांची फडणवीस-पवार भेटीवर प्रतिक्रिया

News Desk