HW News Marathi
महाराष्ट्र

“…ही त्यांची खंत आहे, म्हणून त्यांना गरळ ओकायची सवय लागलीये”, अजित पवारांचा आशिष शेलारांवर निशाणा!

मुंबई। महाविकासआघाडी सरकारमध्ये सुरू असलेले वाद पाहाता राज्यात कधीही निवडणुका लागू शकतील, असं भाकित भाजपा आमदार आशिष शेलार यांनी वर्तवल्यानंतर आता त्या गोष्टीचा समाचार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. तसेच, महाविकासआघाडीचं वर्णन घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज असं करता येईल, या आशिष शेलार यांच्या खोचक टीकेला देखील अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचा चांगलाच कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे.

“मी कधीही त्या गोष्टीला महत्त्व देत नाही”

आशिष शेलार आज मावळ दौऱ्यावर असताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर खोचक टीका केली. भाजपाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना आशिष शेलार म्हणाले, “काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं वर्णन घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज असं होईल”. त्यांच्या या विधानावर अजित पवार यांनी पलटवार केला आहे. “आज सरकार त्यांचं नाही ही त्यांची खंत आहे. त्यांचं दुखणं इतकं मोठं आहे की त्यावर दुसरं काहीही न करता अशीच गरळ ओकायची त्यांना सवय लागली आहे. मी कधीही त्या गोष्टीला महत्त्व देत नाही”, असं अजित पवार म्हणाले. माझा सिंहगड, माझं अभियान या मोहिमेचा शुभारंभ आज सिंहगडावर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याहस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.

तेव्हा तुझ्या जबड्यात हात घालू

दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवार यांनी भाजपा-शिवसेनेचं सरकार असताना झालेल्या आरोप-प्रत्यारोपांची देखील आठवण करून दिली. महाविकासआघाडी सरकारमधल्या तिन्ही पक्षांमध्ये विसंवाद आणि भांडणं असल्याच्या आशिष शेलार यांच्या टीकेवर अजित पवार बोलत होते. “मागे भाजपा-शिवसेनेचं सरकार होतं. तेव्हा तुझ्या जबड्यात हात घालू, कोथळा काढू, वाघ-सिंह प्राण्यांची भरपूर आठवण काढली होती. तो निवडणुकांचा काळ होता. त्यानंतर त्यांनी सांगितलं की निवडणुकीत असं बोलायचं असतं आणि विसरून जायचं असतं. आताही ती पद्धत त्यांनी ठेवली आहे. आम्ही काही वाघ-सिंह करणार नाही. उद्धव ठाकरेही समंजस आहेत आणि आम्ही सगळे देखील एकमेकांना समजून घेऊ”, असं अजित पवार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्रिपद न मिळालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याची नाराजी पुन्हा उघड, जयंत पाटलांच्या दौऱ्यात अनुपस्थिती!

News Desk

टिव्हीच्या नेटवर्क मध्ये राहणाऱ्यांना जनतेचे नेटवर्क काय कळणार? अजितदादा भाजपवर भडकले

News Desk

पुणेकरांनी गव्यास मारले ते पाकिस्तान-चीनच्या चिथावणीमुळेच! सामनातून पुण्यावर टिका करत दानवेंवर निशाणा

News Desk