मुंबई। देशभरात गेल्या २४ तासांमध्ये करोनाचे ९,३०४ सर्वाधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर २४ तासांमध्ये २६० रुग्णांचा झाला मृत्यू आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या पोहोचली २ लाख १६ हजार ९१९ वर पोहोचली. तर १,०६,७३७ सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आहे. देशातील एकूण रुग्णांपैकी १,०४,१०७ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण ६,०७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
This is the highest single day spike in the number of #COVID19 cases (9304) & deaths (260) in India. https://t.co/EZBy0XFGNt
— ANI (@ANI) June 4, 2020
देशात महाराष्ट्र कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. राज्यात काल ९९६ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३२ हजार ३२९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, काल कोरोनाच्या २५६० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३९ हजार ९३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ७४ हजार ८६० झाली, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.