HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने केली मंत्रिपदाची मागणी… सुप्रिया सुळे अजित पवारांशी बोलणार !

औरंगाबाद | राज्यात नुकत्याचं पदवीधर आणि शिक्षक मतदारासंघाच्या निवडणुका पार पडल्या.या निवडणुकांच्या निकालामध्ये महाविकासआघाडीला घवघवीत यश मिळालं. या निवडणुकीमध्ये सलग ३ वेळा निवडून येत आमदार सतीश चव्हाण यांनी विक्रम प्रस्थापित केला आहे. पदवीधर निवडणुकीमध्ये असं यश मिळाल्यानंतर सतिश चव्हाण किंवा मला मंत्री करा अशी स्पष्ट मागणी शिक्षक मतदार संघातील आमदार विक्रम काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली आहे.

विक्रम काळे यांनी थेट सुप्रिया सुळेंकडे मंत्रिपदाची मागणी केल्यानंतर सुप्रिया सुळेंनी ही मागणी रास्त असल्याचं म्हटले आहे. अजित पवार, जयंत पाटील आणि पक्ष प्रमुख शरद पवार साहेबांपर्यंत ही मागणी आपण पोहोचवणार असल्याची ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. खासदार सुळे यांच्या हस्ते नवनिर्वाचित आमदार सतीश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

शिक्षण मंत्रिपदाची देण्यात अडचण !

आमदार सतिश चव्हाण यांनी विक्रम काळे किंवा मला शिक्षण मंत्री पद द्या अशी मागणी भाषणात केली होती. याविषयी बोलताना शिक्षण मंत्री पद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे नसून काँग्रेस पक्षाकडे असल्याचं सुप्रिया सुळे यांनी नमूद केलं. मात्र महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काही अशक्य नसल्याचं देखील त्यांनी म्हटलयं त्यामुळे आगामी काळात शिक्षणमंत्रीपद राष्ट्रवादीकडे येणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आषाढी एकादशींनिमित्ताने पंतप्रधान मोदी, बिग बींनी मराठीतून दिल्या शुभेच्छा

News Desk

आपलं घराणं कुठलं? आणि आपण…, शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना खोचक सवाल

News Desk

#Coronavirus : पुण्यात आज ८० नवे कोरोना पॉझिटिव्ह, १३ जण कोरोनामुक्त

News Desk