HW News Marathi
महाराष्ट्र

‘कोरोनो’च्या पार्श्वभूमीवर यंदाचा गुढीपाडवा घरात थांबूनच साजरा करावा

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘कोरोनो’च्या पार्श्वभूमीवर आलेला यंदाचा गुढीपाडवा सर्वांनी घरात थांबूनच साजरा करावा, कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर येऊ नये, गर्दी टाळावी, असे आवाहन अजित पवारांनी केली आहे. देशावरचा ‘कोरोना’चा धोका पूर्णपणे संपल्यानंतरचा आनंद साजरा करण्यासाठी या गुढीपाडव्याचा उत्साह राखून ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाची सुरुवात घरोघरी गुढ्या उभारुन, शोभायात्रांचे आयोजन करुन सामुहिक पद्धतीने करण्याची आपली परंपरा आहे. यावेळीही घरोघरी गुढ्या उभारल्या जातील, परंतु शोभायात्रांचे आयोजन व सामुहिक आयोजन टाळण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह, कौतुकास्पद असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. नागरिकांनी यंदा ‘कोरोना’विरोधात लढण्याची, जनजागृती करण्याची, ‘कोरोना’ला हरविण्याच्या संकल्पाची गुढी उभारावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘महिला सुरक्षितेसाठी पोलीस आयुक्तांच्या 12 मोठ्या सूचना’ !

News Desk

अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर थोड्याच वेळात शरद पवारांची पत्रकार परिषद

News Desk

महाराष्ट्रातील तरुणाईचे आक्रंदन रॅपच्या माध्यमातून, राष्ट्रवादीचा अनोखा प्रचार

News Desk