HW News Marathi
महाराष्ट्र

नांदेडात शेकडो क्विंटल बोगस बियाणे जप्त

नांदेड। नेहमीप्रमाणे यावर्षीही नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात बोगस-बियाणे बाजारात आले आहे. कृषी विभागाने कारवाई करीत शेकडो क्विंटल बोगस बियाणे आज (२९ मे) जप्त केले आहे. शहरातील अर्धापुर रोडवरील एका गोदामात सोयाबीन ,उडीद , हरभरा या बियाणांची अवैधरित्या बियाणे पॅकिंग कंपनीवर कृषी विभागाने छापा मारून शेकडो क्विंटल बोगस बियाणे जप्त केले आहे .

कृषी विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धडक कार्यवाही करत ह्या बोगस बियाणे कंपनीचा कृषी विभागाने भांडाफोड केला. ज्यात सोयाबीन , उडीद , मूग , हरभरा यां बोगस बियाणांची पॅकींग करण्यात येत असल्याची माहिती संभाजी ब्रिगेड शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष संतोष गव्हाणे यांनी कृषी विभागास दिल्या नंतर कृषी अधिकारी अनिल शिरपुरे व नांदेड पोलिसांच्या संयुक्त पथकाने हा बोगस बियाणे साठा उघडकीस आणला .

ज्यात प्रथम दर्शनी सोयाबीन , उडीद , हरभरा इत्यादी बियाणाची बोगस पध्दतीने बियाणे तयार करण्यात येत असल्याचे आढळून आले .सदर कंपनी ही मयुरी सिड्स ,बुलेट ऍग्री प्रॉडक्ट्स या नावाने बोगस बियाणे कंपनी चालत असल्याचे निदर्शनास आलं .तर बियाणे कंपनीचा पत्ता , कंपनीचा बोर्ड , बॅगवरील ठिकाण , लॉट नंबर , बॅच नंबर अशा अनेक चुका या बोगस कंपनीत कृषी विभागास निदर्शनास आल्या आहेत .या गोदामात सोयाबीन 100 क्विंटल हरभरा , 20 क्विंटल उडीद , 100 क्विंटल पॅकिंग मशीन , ग्राइंडर मशीन व काम करणारे 20 कामगार आढळून आले आहेत . सदर गोदाम कृषी विभाग व पोलिस प्रशासन यांच्या वतीने सील करण्यात आले आहे.पुढील कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील इमारतींच्या दुरूस्ती व पुनर्विकासासाठी शासन सदैव प्रयत्नशील! – डॉ.जितेंद्र आव्हाड

Aprna

“मी मास्क काढणार नव्हतो मात्र…” अजित पवार म्हणाले!

News Desk

विधान परिषदेतील राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची मुदतवाढ संपणार

News Desk