HW News Marathi
Covid-19

यंदाचा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार डॉ. तात्याराव लहाने यांना जाहीर

मुंबई। यंदाच्या वर्षाचा राजर्षी शाहू पुरस्कार राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक, ज्येष्ठ नेत्र शल्यचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांना जाहीर करण्यात आल्याची घोषणा जिल्हाधिकारी तथा राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज (२५ जून) माहिती दिली आहे.

राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना राजर्षी शाहू पुरस्काराने सन्मानित केले जाते. हा पुरस्कार सोहळा २६ जून रोज म्हणजे राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी होतो. मात्र,यावेळी हा कोरोनाचा प्रादुर्भावामुळे होणार नसल्यामुळे याहा पुरस्काराचे वितरण डॉ. लहाने त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना येणार आहे.

डॉ. लहाने यांना २००८ साली भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. बिनटाक्याच्या नेत्र शस्त्रकियेसाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी दीड लाखाहून अधिक लोकांच्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मजूरांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही – अरविंद केजरीवाल

News Desk

पुणेकरांना दिलासा …पुण्यातला विकेंड लॅाकडाऊन अखेर रद्द !

News Desk

भाजपकडून काहींना बडबड करण्याचा ठेका, मात्र आम्ही काडीचीही किंमत देत नाही !

News Desk