HW News Marathi
महाराष्ट्र

 राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु, सरकारवर ताशेरे ओढण्यास विरोधक सज्ज

मुंबई। यंदाचे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेनाला आजपासून सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात विरोधक महाविकासआघाडी सरकारवर ताशेरे ओढण्यासाठी तयारीत आहेत. राज्या अर्थसंकल्पीय अधिवेशन हे आजपासून (३ मार्च) ते २५ मार्चपर्यंत असणार आहेत. महाविकासआघाडी सरकार सुद्धा विरोधकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास सज्ज झाली आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे याआधीच्या अधिवेशनात अनुपस्थितीत होते. यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली.

दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशन राज्याचे अल्पसंख्याक मंत्री हे सध्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीच्या कोठडीत आहे. त्यामुळे विरोधक हे मलिकांच्या राजीनाम्यावरून राज्याचे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्याचप्रमाणे, राज्यातील वीजेचा प्रश्न, मराठा आणि ओबीसी आरक्षण, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, कोरोना काळात झालेला भ्रष्टाचार, राज्यापाल नियुक्ती १२ आमदार, केंद्रीय तपास यंत्रणेचा चुकीचा वापर, वाईन विक्री यासारख्या आदी मुद्यांवर राज्याच्या अधिवेशन चर्चा होणार आहे.

मविआ सरकार हे इतिहासातील भ्रष्टाचारी सरकार – फडणवीस

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून चहापान्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. परंतु, विरोधकांनी सरकाच्या चहापान्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याची माहिती राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल (२ मार्च) पत्रकार परिषदेत दिली यावेळी फडवीसांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला. फडणवीस म्हणाले, “महाविकासआघाडी सरकार हे इतिहासातील भ्रष्टाचारी सरकार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच्या अधिवेशनात म्हटले होते की, तकऱ्यांचे वीज मीटर कापले जाणार नाहीत, असा शब्द दिला होता. परंतु, मीटर कापावे लागतील असे ते शेवटच्या दिवशी म्हणाले.यामुळे आता अजित पवारांच्या शब्दाला काहीच किंमत राहिली नाही. ठाकरे सरकार हे सावकारी सरकार आहे, असे ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधान परिषदेवरील नियुक्त्यांचे आदेश राज्यपालांना देणार नाही – सर्वोच्च न्यायालय

News Desk

या महिन्याच्या अखेरीस कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी करणार काँग्रेसमध्ये प्रवेश!

News Desk

जोरजबरदस्तीने जशाच्या तशा हा कृषी कायदा राज्यात लागू होणार नाही – मुख्यमंत्री

News Desk