HW News Marathi
Covid-19

१८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरणाची नोंदणी कशी असणार? जाणून घ्या…

नवी दिल्ली | देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असून, सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. आता केंद्र सरकारने कोरोना लसीकरणासाठी वयाची अट काढून टाकली आहे. यामुळे १८ वर्षांवरील सर्वांनाच कोरोना लस देण्यात येणार आहे. यासाठी १८ वर्षांवरील व्यक्तींना १ मेपासून नोंदणी करता येणार आहे.

१८ वर्षांवरील सर्व व्यक्ती १ मेपासून कोरोना लस घेण्यास पात्र आहेत. ते सरकारच्या को-विन प्लॅटफॉर्मवर नाव नोंदवू शकतात. नाव नोंदवल्यानंतर ते लसीकरण केंद्रावर जाऊन नियोजित वेळी लस घेऊ शकतात. केंद्र सरकारने सर्वांना लस देण्याची घोषणा केली. कोरोना विरोधात लढण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी २५० रुपये मोजावे लागत होते. सरकारने आता ही किंमत कमी करुन २०० रुपयांवर आणली आहे.

स्पुटनिकचाही पर्याय उपलब्ध असणार!

नुकतीच केंद्र सरकारने देशात परदेशी लसींच्या वितरणाला मान्यता दिली आहे. त्यामुळे फायझर, मॉडेर्ना, स्पुटनिक या लसींचे डोस देखील भारतात लवकरच वितरीत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, १ मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणामध्ये रशियाची स्पुटनिक व्ही ही लस देखील काही लसीकरण केंद्रांवर पर्याय म्हणून उपलब्ध असेल, असं राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एस. शर्मा यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं आहे. मात्र, फायझर आणि मॉडेर्ना या लसींबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

बुधवारी सिरम इन्स्टिट्युटकडून कोविशिल्ड लसीचे नवे दर जाहीर करण्यात आले असून त्यानुसार १ मेपासून राज्य सरकारांना कोविशिल्ड लसीचा प्रत्येक डोस ४०० रुपयांना तर खासगी रुग्णालयांना हेच डोस ६०० रुपयांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

कशी कराल लसीकरणासाठी नोंदणी? जाणून घ्या…

1. cowin.gov.in संकेतस्थळावर जा आणि तुमचा मोबाईल क्रमांक टाका

२. मोबाईलवर आलेला ओटीपी दिलेल्या जागेत भरून Verify वर क्लिक करा

३. ओटीपी व्हॅलिडेट झाल्यावर व्हॅक्सिनसाठीच्या नोंदणीचं पेज उघडेल. इथे तुमची माहिती भरा आणि Register वर क्लिक करा

४. तुम्हाला मोबाईलवर नोंदणी यशस्वी झाल्याचा मेसेज येईल. नोंदणी झाल्यावर तुम्हाला अकाऊंट डिटेल्स दाखवले जातील. या पेजवर तुम्ही लसीकरणासाठीची अपॉइंटमेंट निवडू शकता.

५. एका मोबाईल क्रमांकावर एकूण ४ लोकांची लसीकरणासाठी नोंदणी करण्याची परवानगी असेल. यासाठी नोंदणी करताना सर्व सदस्यांची माहिती भरणं आवश्यक असेल.

६. आरोग्य सेतू मोबाईल अॅपच्या माध्यमातून देखील तुम्हाला नोंदणी करता येऊ शकेल. यासाठी अॅपवर स्वतंत्र लिंक देण्यात आली असून तिथे नोंदणीसाठी तुम्हाला तुमचं नाव, वय, लिंग अशी माहिती भरून नोंदणी करता येऊ शकेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांना ‘कोरोना’ची लागण

News Desk

MPSCच्या परीक्षांची तारीख जाहीर!

News Desk

मोहरमसाठी नियमावली जाहीर…. जाणून घ्या नियम

News Desk