HW News Marathi
महाराष्ट्र

डिसलेंवर कारवाई करणाऱ्यांची होणार चौकशी; खुद्द शिक्षणमंत्र्यांनी घेतली दखल

सोलापूर | ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले गुरुजी यांना अमेरिकन सरकारची फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर झाली आहे. त्यासाठी त्यांना अमेरिकेत जावं लागणार असून शिक्षण विभागाने अद्याप त्यांची रजा मंजूर केली नव्हती. त्यामुळे गुरुजी सरकारी नोकरी सोडण्याच्या विचारात असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आता खुद्द शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यामुळे आता डिसले गुरुजींचा परदेशी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

वर्षा गायकवाड नाशिक दौऱ्यावर आल्या आहेत. यावेळी गायकवाड यांनी आगामी काळात इयत्ता पहिली व दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार असल्याची माहिती दिली. तसेच डिसले यांना अमेरिकेत जाण्यासाठी आवश्यक असणारी रजा मंजूर करण्याचे आदेशही गायकवाड यांनी दिले आहेत. गायकवाड यांनी या प्रकरणाची दखल घेत डिसले यांचा रजेचा अर्ज मंजूर करण्याचे सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. या संदर्भात गायकवाड यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

डिसलेंवर कारवाई करणाऱ्यांची होणार चौकशी

दरम्यान, शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांनी डिसले गुरुजींची रजा मंजूर करण्यात येत नव्हती. तसेच त्यांना त्रास दिल्याचा प्रकार समोर आला होता. यामुळे डिसले आपली सरकारी नोकरी सोडण्याच्या मनस्थितीत असल्याचे सांगितले जात होते. तसेच सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी डिसले यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी डिसले यांच्यावर गंभीर आरोप देखील केले होते. त्यांचा रजेचा अर्ज मंजूर होत नसल्यामुळे त्यांची फुलब्राईट स्कॉलरशिप हातातून जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती. मात्र, ही बाब प्रसार माध्यमांनी उचलून धरल्याने हा वाद वर्षा गायकवाड यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी डिसले गुरुजी या संशोधनासाठी नक्की अमेरिकेत जातील, अशी ग्वाही दिली. तसेच डिसलेंवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल, असंही त्या म्हणाल्या. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गावी जाण्याची सोय होईपर्यंत विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याची सक्ती नाही

swarit

राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी असली तरी…

News Desk

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील मार्गावरील एसटीची वाहतूक बंद राहणार

News Desk