HW News Marathi
महाराष्ट्र

बुली बाई अॅप प्रकरणी तीन जणांना अटक; कसा लावला छडा? हेमंत नगराळेंनी दिली माहिती

मुंबई | मागील काही दिवसांपासून बुल्ली बाई अॅप हे प्रकरण अधिक चर्चेत आहे. या अॅपवर विशिष्ठ समाजातील महिलांचे फोटो अपलोड करण्यात आले होते. तसेच आक्षेपार्ह पोस्ट नमूद करण्यात आल्या होत्या. या अ‍ॅपमुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण असून या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे.

बुल्ली बाई अॅप प्रकरणावर आज (५ जानेवारी) हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी तीन जणांना अटक केल्याचे सांगितले. तसेच पोलिसांनी कशी कारवाई करून त्या तिघांना ताब्यात घेतलं? हे देखील त्यांनी सांगितलं. यामध्ये विशाल कुमार झा आणि श्वेता सिंह यांच्यासह तिसरा आरोपी हा त्यांचा मित्र आहे. दरम्यान, श्वेता सिंग हिला उत्तराखंडमध्ये अटक झाली असून तिची पाच दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर झाली आहे. तर तिसरा आरोपीसुद्धा उत्तराखंड येथील असून त्याचीसुद्धा ट्रान्झिट रिमांड होईल.

हेमंत नगराळे म्हणाले, “गेल्या तीन दिवसांपासून बुली बाई अॅप प्रकरणाचा तपास सुरु आहे. अजूनही बराच तपास बाकी आहे. सोशल मीडियावर बुली बाई नावाचं अॅप तयार करण्यात आलं होतं. ३१ डिसेंबरला हे अॅप लॉन्च करण्यात आलं होतं. ज्यावर विशिष्ट समाजातील महिलांचे फोटो एका वेबसाईटवर लोड करण्यात आले होते. तसेच त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह्य मजकूर लिहिण्यात आला होता. त्यानंतर २ जानेवारीला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला”, अशी माहिती नगराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रकरणाचा तपास सुरू केला असता पोलिसांना आणखी काही धागेदोरे हाती लागले. ‘बुली बाई’ ही वेबसाईट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी ट्विटर हॅन्डलही सुरू करण्यात आलं होतं. त्यानंतर ज्या ट्विटर हॅन्डलवरुन या अॅपची माहिती दिली जात होती, त्याबाबत पोलिसांनी तपास केला. पोलिसांनी या ट्विटर अकाऊंटच्या फॉलोअर्सची माहिती काढली. ही वेबसाईट फक्त पाचच जण फॉलो करत होते. या वेबसाईटवर महिलांच्या भावना दुखावतील असे कृत्य करण्यात आले. तसेच त्यांची बोलीही लावली जात होती.

दरम्यान, आतापर्यंत या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली असून सर्व आरोपींची कसून चौकशी केली जाईल, तसेच त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती नगराळे यांनी दिली. तसेच अजूनही मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास सुरु असल्याचं नगराळे यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आघाडीच्या मंत्र्यांकडून बदल्यांमध्ये कमाई झाल्याने दिसून आले, त्यामूळे सीआयडी चौकशी करावी – चंद्रकांत पाटील

News Desk

देवेंद्र फडणवीसांनी दौरे करण्यासाठी ई-पास काढला?, माहिती अधिकारात विचारला प्रश्न

News Desk

मेट्रो कारशेड प्रकल्पा विषयी मुख्यमंत्री जनतेची दिशाभूल करतायत, किरीट सोमय्या यांचा आरोप

News Desk