HW News Marathi
महाराष्ट्र

ठाकरे सरकारमध्ये तीन महिलांना मंत्री पदे, शिवसेनेच्या एकाही महिलेला स्थान नाही

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा आज पहिला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. महाविकासआघाडी सरकारमध्ये २६ कॅबिनेट आणि १० राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. मात्र, ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात फक्त तीन महिला आमदाराचा समावेश करण्यात आला आहे. परंतु, यात शिवसेनेच्या एकाही महिला नेता नाही. काँग्रेसने यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड यांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी दिली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने अदिती तटकरे यांना राज्यमंत्रीपदाची संधी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुनिल तटकरेंच्या कन्या आदिती तटकरे यांना महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यांची पहिल्याच टर्ममध्ये राज्यमंत्रिपदी निवड झाली आहे. आदिती तटकरे या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात अनुभवी मंत्र्यांसह तरुणांनाही संधी देण्यात आली आहे.

गायकवाड यांचा समावेश करण्यात आला आहे. वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या जेष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांची कन्या आहे. वर्षा गायकवाड या तीन वेळा धारावी मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. विदर्भातील काँग्रेसच्या एकमेव महिला आमदार यशोमती ठाकूर यांना ठाकरे सरकारमध्ये स्थान मिळाले आहे. यशोमती ठाकूर यांना धारावी मतदार संघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आली आहे. महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये सर्वाधिक महिला आमदारांची सख्या काँग्रेसमध्ये आहे. काँग्रेसमध्ये ४४ आमदारांपैकी पाच महिला आमदार आहेत. त्यापैकी त्यांनी दोन महिलांना संधी दिली. राष्ट्रावादीच्या ५४ आमदारांपैकी २ महिला आमदार आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंढरपूरच्या सभेत जयंत पाटलांचं भर पावसात भाषण! साताऱ्याची पुनरावृत्ती होणार?

News Desk

महाविकासआघाडीतील पक्षांनी एकमेकांची काळजी घेतली पाहिजे !

News Desk

महाराष्ट्राचं नेतृत्व एका चांगल्या हातात आहे, ग्रामपंचायत निवडणुकीवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

News Desk