HW News Marathi
Covid-19

पुण्यात सलून-ब्युटी पार्लरकरिता पाळावेच लागणार ‘हे’ नियम

पुणे | राज्यातील सलून्स आणि ब्युटी पार्लर्स २८ जूनपासून पुन्हा सुरु करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सर्व सामान्यांसाठी हा निश्चितच महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे. राज्य शासनाने ‘मिशन बिगिन टप्पा ४’ची घोषणा केली असून त्यानुसार काही अटी आणि शर्तींसह राज्यात सलूनची दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर, आता पुण्यात सलून-ब्युटी पार्लर सुरु करण्याकरिता कोणकोणते नियम-अटी असतील याबाबतची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज (२७ जून) ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

पुण्यात सलून-ब्युटी पार्लरसाठी ‘हे’ आहेत प्रमुख नियम

केश कर्तनालय, सलून आणि ब्युटी पार्लर या ठिकाणी केवळ पूर्व नियोजित वेळ निश्चित करून खालील अटींच्या आधारे प्रवेश नियंत्रित करण्यात येईल, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.

■ केशकर्तन, केसांना रंग देणे, वॅक्सिंग, थ्रेडिंग, इ. सेवा देता येतील, मात्र त्वचेशी निगडीत कोणत्याही प्रकारची सेवा देता येणार नाहीत, याबाबत सूचना दुकानावर असाव्यात.

■ या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी संरक्षित साहित्य जसे, हातमोजे, अप्रोन आणि मास्कचा वापर करणे आवश्यक राहीन.

■ कामाचे सर्व ठिकाणी जसे खुर्च्या, दुकानातील मोकळी जागा, फरशी. इ. प्रत्येक २ तासांनंतर सॅनिटाइज होणे आवश्यक राहील.

■ दुकानात येणाऱ्या गिऱ्हाइकांसाठी केवळ एकदाच वापरता येणारे (Disposable) टॉवेल/नैकिनचा वापर करावा, सेवेकरिता जी उपकरणे एकदा वापरण्याजोगी नाहीत (Non Disposable)

ती प्रत्येक सेवेनंतर सॅनिटाइज आणि निर्जंतुक करूनच वापरावीत,

■ केशकर्तन अनुषंगाने व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक दुकानावर वरीलप्रमाणे काळजी घेतली जाते, अशा आशयाची नोटीस माहितीसाठी प्रसिध्द करावी.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आतापर्यंत तब्बल १३ लाखांहूनही अधिक रुग्ण कोरोनामुक्त

News Desk

जळगावमधील ‘कोरोना’चा मृत्यूदर कमी करण्यासाठी टास्क फोर्स !

News Desk

कल्याण-डोंबिवलीमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला

News Desk