HW News Marathi
Covid-19

राज्यात आज २,१९० नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा तासागणिक वाढत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल २,१९० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आज (२७ मे) राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता ५६,९४८ वर पोहोचला आहे. तर गेल्या २४ तासांत राज्यात १०५ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे १८९७ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र राज्यातील एक दिलासादायक बाब अशी कि, आज राज्यात तब्बल ९६४ रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा १७,९१७ इतका आहे. त्यामुळे राज्यात आता एकूण ३७,१२५ ऍक्टिव्ह कोरोनाबाधित आहेत. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तब्बल तीन महिन्यानंतर झी मराठीच्या ‘या’ मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात

News Desk

एकही केस लपवायची नाही, उद्या डेथ रेट वाढला तर बाहेर बिंग फुटणार | उद्धव ठाकरे

News Desk

राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीतील ‘हे’ महत्वाचे मुद्दे

News Desk