मुंबई। आज राज्यात कोरोनाबाधित ७७८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ६४२७ झाली आहे. आज ५१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ८४० रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ५३०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (२३ एप्रिल) दिली.
राज्यात आज 778 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 6427 अशी झाली आहे. यापैकी 840 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 23, 2020
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९६ हजार ३६९ नमुन्यांपैकी ८९ हजार ५६१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ६४२७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख १४ हजार ३९८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ८७०२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात १४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २८३ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील ६, पुणे येथील ५, नवी मुंबई येथे १, नंदूरबार येथे १ आणि धुळे मनपा येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यात ८ पुरुष तर ६ महिला आहेत. आज झालेल्या १४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २ रुग्ण आहेत तर ९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ३ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. दोन रुग्णांबाबत इतर आजाराची माहिती अद्याप मिळू शकली नाही उर्वरित १२ मृत्यूंपैकी ७ रुग्णांमध्ये ( ५८ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ४७७ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ७४९१ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २७.२६ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
राज्यातील कोरोना बाधितांची संख्या
- मुंबई महानगरपालिका -४२०५ (१६७)
- ठाणे – ३४ (२)
- ठाणे मनपा – २१४ (४)
- नवी मुंबई मनपा -९७ (४)
- कल्याण डोंबिवली मनपा – १२४ (३)
- उल्हासनगर मनपा – २
- भिवंडी निजामपूर मनपा – ८
- मीरा भाईंदर मनपा – ११६ (२)
- पालघर – २१ (१)
- वसई विरार मनपा – १०९ (३)
- रायगड – १४
- पनवेल मनपा – ३६ (१)
- ठाणे मंडळ एकूण – ४९८० (१८७)
- नाशिक – ४
- नाशिक मनपा – ७
- मालेगाव मनपा – १०९ (९)
- अहमदनगर – २४ (२)
- अहमदनगर मनपा – ८
- धुळे – ४ (१)
- धुळे मनपा – १३ (१)
- जळगाव – ६ (१)
- जळगाव मनपा – २ (१)
- नंदूरबार – ७ (१)
- नाशिक मंडळ एकूण – १८४ (१६)
- पुणे – ४१ (१)
- पुणे मनपा – ८१२ (५९)
- पिंपरी चिंचवड मनपा – ५७ (२)
- सोलापूर – १
- सोलापूर मनपा – ३२ (३)
- सातारा – २० (२)
- पुणे मंडळ एकूण – ९६३ (६७)
- कोल्हापूर – ६
- कोल्हापूर मनपा – ३
- सांगली – २५
- सांगली मिरज कुपवाड मनपा – १ (१)
- सिंधुदुर्ग – १
- रत्नागिरी – ७ (१)
- कोल्हापूर मंडळ एकूण – ४३ (२)
- औरंगाबाद मनपा – ४० (५)
- जालना – ३
- हिंगोली – ७
- परभणी मनपा – १
- औरंगाबाद मंडळ एकूण – ५१(५)
- लातूर – ८
- उस्मानाबाद – ३
- बीड – १
- नांदेड मनपा – १
- लातूर मंडळ एकूण – १३
- अकोला – ११ (१)
- अकोला मनपा – ९
- अमरावती मनपा – ७ (१)
- यवतमाळ – १७
- बुलढाणा – २४ (१)
- वाशिम – १
- अकोला मंडळ एकूण – ६९ (३)
- नागपूर – २
- नागपूर मनपा – ९८ (१)
- गोंदिया – १
- चंद्रपूर मनपा – २
- नागपूर मंडळ एकूण – १०३ (१)
- इतर राज्ये – २१ (२)
एकूण – ६४२७ (२८३)
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.