HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र

आज एका दिवसात ९७ रुग्णांचा बळी, राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५४ हजार ७५८ वर

मुंबई। राज्यात आज कोरोनाच्या २०९१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या ३६ हजार ४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज (२६ मे) ११६८ रुग्ण बरे होवून घरी गेले असून आतापर्यंत १६ हजार ९५४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आत्तापर्यंतच्या एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५४ हजार ७५८ एवढी आहे. तसेच राज्यात एकाच दिवसात ९७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ९० हजार १७० नमुन्यांपैकी ५४ हजार ७५८ जणांचे नमूने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ६७ हजार ६२२लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५ हजार २०० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात ९७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या १७९२ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूपैकी ३५ मृत्यू हे मागील दोन दिवसातील आहेत. तर उर्वरित दोन मृत्यू हे १७ एप्रिल ते २३ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ६२ मृत्यूपैकी मुंबईचे १९, ठाण्याचे १५, कल्याण-डोंबीवलीचे ९, सोलापूरचे ६, मिरा-भाईंदरचे ५,उल्हासनगरचे ३, मालेगाव मधील ३ तर पुण्यातील एक आणि औंरगाबादमधील १ मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ३९, पुण्यात ८, ठाणे शहरात १५, औरंगाबाद शहरात ५, सोलापूरात ७, कल्याण डोंबिवलीमध्ये १०, मीरा-भाईंदरमध्ये ५, मालेगाव आणि उल्हासनगर मध्ये प्रत्येकी ३, नागपूर शहरात १, रत्नागिरीमध्ये १ मृत्यू झाला आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६३ पुरुष तर ३४ महिला आहेत. आज झालेल्या ९७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३७ रुग्ण आहेत तर ४९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ११ जण ४० वर्षांखालील आहे. या ९७ रुग्णांपैकी ६५ जणांमध्ये (६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी

 • मुंबई : 32,974 (1065)
 • ठाणे : 484 (5)
 • ठाणे मनपा : 2866 (52)
 • नवी मुंबई मनपा : 2154 (32)
 • कल्याण डोंबिवली मनपा : 989 (18)
 • उल्हासनगर मनपा : 198 (6)
 • भिवंडी निजामपूर मनपा : 99 (3)
 • मीरा भाईंदर मनपा : 525 (10)
 • पालघर :122 (3)
 • वसई विरार मनपा: 630 (15)
 • रायगड : 471 (5)
 • पनवेल मनपा : 374 (12)
 • ठाणे मंडळ एकूण : 41,886 (1226)
 • नाशिक : 123
 • नाशिक मनपा : 147 (२)
 • मालेगाव मनपा: 722 (47)
 • अहमदनगर : 64 (5)
 • अहमदनगर मनपा : 20
 • धुळे : 29 (३)
 • धुळे मनपा : 100 (6)
 • जळगाव : 324 (36)
 • जळगाव मनपा : 123 (5)
 • नंदूरबार : ३२ (2)
 • नाशिक मंडळ एकूण : 1684 (106)
 • पुणे : 383 (7)
 • पुणे मनपा: 5602 (268)
 • पिंपरी चिंचवड मनपा: 350 (7)
 • सोलापूर: 25 (2)
 • सोलापूर मनपा:621 (47)
 • सातारा: 339 (5)
 • पुणे मंडळ एकूण: 7320 (336)
 • कोल्हापूर:312 (1)
 • कोल्हापूर मनपा: 28
 • सांगली: 76
 • सांगली मिरज कुपवाड मनपा: ११ (१)
 • सिंधुदुर्ग: 19
 • रत्नागिरी: 171 (5)
 • कोल्हापूर मंडळ एकूण : 617 (7)
 • औरंगाबाद : 26 (1)
 • औरंगाबाद मनपा : 1284 (52)
 • जालना: 73
 • हिंगोली: 133
 • परभणी: 19 (1)
 • परभणी मनपा: 6
 • औरंगाबाद मंडळ एकूण : 1541(54)
 • लातूर: 74 (3)
 • लातूर मनपा : 8
 • उस्मानाबाद: 37
 • बीड: 32
 • नांदेड: 19
 • नांदेड मनपा: 86 (5)
 • लातूर मंडळ एकूण : 256 (8)
 • अकोला: 39 (2)
 • अकोला मनपा: 398 (15)
 • अमरावती: 16 (2)
 • अमरावती मनपा: 177 (12)
 • यवतमाळ: 115
 • बुलढाणा :49 (3)
 • वाशिम: ८
 • अकोला मंडळ एकूण:802 (34)
 • नागपूर: 9
 • नागपूर मनपा: 472 (8)
 • वर्धा: 7 (1)
 • भंडारा: 14
 • गोंदिया: 47
 • चंद्रपूर: 16
 • चंद्रपूर मनपा: 9
 • गडचिरोली: 26
 • नागपूर मंडळ एकूण : 600 (9)
 • इतर राज्ये: 52 (12)
 • एकूण 54 हजार 758 (1792)

Related posts

Raju Shetty HW Exclusive : लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियाचा वापर अफवांसाठी नव्हे तर …!

News Desk

लॉकडाऊनच्या काळात सोनू सूद हा नवा ‘महात्मा’ निर्माण झाला

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरणार

News Desk