HW News Marathi
देश / विदेश

आज ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये करणार प्रवेश

नवी दिल्ली | काँग्रेसचे मध्य प्रदेशातील मातब्बर नेता ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल (१० मार्च) सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ज्योतिरादित्य शिंदेच्या राजीनाम्याने देशातील राजकारण ठवळून निघाले आहे. ज्योतिरादित्य शिंदेंसोबतच पक्षाच्या २२ आमदारांनीही आपले पद सोडले. यानंतर मध्य प्रदेश सरकार आता अल्पमतात आल्याचे चित्र आहे. ज्योतिरादित्य आज (११ मार्च) दुपारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

काँग्रेसशी बंडखोरी करणारे आमदार बेंगळुरुमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहेत. तर अन्य एका आमदाराने कालच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत ज्योतिरादित्य शिंदे पक्षात प्रवेश करणार आहेत. ज्योतिरादित्य हे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे यांचे निकटवर्तीय आहेत. ज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा सोपविली आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपकडून पक्षाकडून राज्यसभेवर पाठविण्यात येणार आणि केंद्रात मंत्रिपद देण्यात येणार असल्याची भाजपने तयारी दाखवली आहे. या पार्श्वभूमीवर ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ज्योतिरादित्या शिंदेंनी राजीनाम्यानंतर नेमके काय लिहिले

“गेल्या १८ वर्षांपासून काँग्रेस पक्षाचा एक सदस्य आहे. मात्र,वेगळ आता मला काँग्रेसपासून वेगळे होण्याची वेळ आली आहे. मी माझ्या काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. गेल्या वर्षभरापासून मी याबाबत विचार करत होतो. आता राजीनामा देत आहे. सुरुवातीपासूनच देशातील नागरिकांची सेवा करणे हे माझे ध्येय आणि उद्देश आहे. पण आता मी हे माझ्या पक्षात करु शकत नाही, असे मला वाटू लागले आहे. त्यामुळे मी आता एक नवी सुरुवात करत आहे. देशाची सेवा करुन देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्याबद्दल मी पक्षातील सदस्यांचे आभार व्यक्त करतो”, असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.

असे आहे मध्य प्रदेश विधानसभेचे गणित

मध्य प्रदेशात विधानसभेच्या २३० जागा आहेत. दोन आमदारांचे निधन झाल्याने ही संख्या २२८ वर पोहोचली आहे. काँग्रेसकडे ११४ आमदार आहेत. इथे बहुमताचा आकडा ११५ आहे. काँग्रेसला ४ अपक्ष आणि २ बसपा, १ सपा आमदाराने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ १२२ वर पोहोचले आहे. दुसरीकडे भाजपकडे १०७ आमदारांचे संख्याबळ आहे. मात्र ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बाजूचे तब्बल २० आमदार राजीनामा देऊन भाजपला साथ देऊ शकतात. त्यामुळे काँग्रेसचे सरकार अल्पमतात येऊ शकते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिलासादायक ! देशात कोरोनाबाधितांच्या आकड्यात ४० टक्क्यांनी घट

News Desk

छुप्या पद्धतीने उत्तर कोरीया बनवतेय जैविक हत्यारं 

News Desk

सीएपीएफच्या कॅन्टीनमध्ये आता फक्त स्वदेशी वस्तुंचीच विक्री

News Desk