HW News Marathi
महाराष्ट्र

आज ठाण्यात मनसेचा शेतकरी महामोर्चा

ठाणे | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज (१७ मे) सरकारविरुद्ध ठाण्यातील गावदेवी मैदान ते ठाणे महानगरपालिका मुख्यालय असा शेतकरी महामोर्चा आयोजित केला आहे. शेतकरी बांधवांनी मनसेच्या या महामोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केले आहे. राज ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी पत्र लिहिले आहे. ‘चला एकवटूया, बेशरम शासनाला धडा शिकवूया’ या नाऱ्यासह दुपारी १ वाजल्यापासून मनसेच्या या शेतकरी महामोर्चाला सुरुवात होणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते शेतकरी बाजारपेठांना सर्वतोपरी मदत करीत असताना केवळ आम्हाला श्रेय मिळू नये म्हणून भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि गुंड प्रशासनावर दबाव आणून शेतकर्‍यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप राज ठाकरे यांनी या पत्रात केला आहे. “ठाण्यात रत्नागिरीचा एक शेतकरी गेली ३ वर्षे नौपाडा विभागामध्ये आंबे विक्रीचा व्यवसाय करीत होता. भाजपच्या १० नगरसेवक, १ जिल्हाध्यक्ष आणि असंख्य भाड्याने आणलेली लोक येऊन जबरदस्तीने जर या आंबा उत्पादक शेतकर्‍याला हटवत असतील, त्या शेतकर्‍याचा लाखभर रुपयांचा माल जप्त करुन त्याचे वार्षिक लाखभर रुपयांचे नुकसान केले जात असेल तर ते सहन करणे कितपत योग्य आहे ?”, असा सवाल देखील राज ठाकरे यांनी या पत्राद्वारे केला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कंपाऊंडरला सतत चर्चेत राहायची भूक, संजय निरुपमांचा  राऊतांना अप्रत्यक्ष टोला

News Desk

राज्य सरकारला राणेंच्या सर्टिफिकेटची गरज नाही – अनिल परब

News Desk

आदित्य ठाकरेंना हजार रुपये पाठवा | धनंजय मुंडे

swarit