मुंबई | देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (१६ जून) आणि उद्या (१७ जून) देशातील २१ राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोना आणि अनलॉक १.० नंतर काय परिस्थिती आहे, यावर चर्चा करणार आहेत. आज दुपारी ३ वाजात मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. पंतप्रधान दोन टप्प्यात देशातील राज्याती मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.
PM @narendramodi will interact with state Chief Ministers on the 16th and 17th. pic.twitter.com/RWGeanxgHd
— PMO India (@PMOIndia) June 12, 2020
पंतप्रधान मोदी पहिल्या पहिल्या टप्प्यात म्हणजे आज २१ राज्यातील मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करणार आहेत. यात पंजाब, आसाम, केरळ, उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश, चंडीगड, गोवा, मणिपूर, नागालँड, लडाख, पुडुचेरी, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोरम, अंदमान-निकोबार, दादर-नगर हवेली, दमण-दीव , सिक्किम आणि लक्षद्वीप या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, उद्या म्हणजे दुसऱ्या टप्प्यात १५ राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. कोरोना रुग्णांची संख्या जास्त असलेल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. यात दिल्ली, महाराष्ट्र, तामिळनाडू, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. या राज्यातील शहरात म्हणजे दिल्ली, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद रुग्ण वाढीचा वेग अधिक आहे. लॉकडाऊननंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी पाचव्यांदा चर्चा करणार आहेत. तर अनलॉक १.० नंतर ही पहिली चर्चा असणार आहे.
द