HW News Marathi
महाराष्ट्र

येवला शहरातील शिवसृष्टी प्रकल्पाच्या जागेची पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पाहणी

नाशिक | पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला शहरात भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत आहे. येवल्यातील महत्त्वपूर्ण प्रकल्पापैकी एक असलेल्या या शिवसृष्टी प्रकल्पाच्या जागेची पाहणी आज (२३ जानेवारी) पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. यावेळी त्यांनी या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी येवला बाजार समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार, दीपक लोणारी,तहसीलदार प्रमोद हिले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सागर चौधरी,आर्किटेक्ट सारंग पाटील,हितेश मोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

येवला विंचूर चौफुली जवळील शहरातील पंचायत समितीच्या जुन्या इमारतीच्या जागेत भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत आहे. या जागेवर असलेल्या जुन्या इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या असून जागेचे सपाटीकरण व स्वच्छता करण्याचे काम करण्यात येत आहे. हे काम पूर्ण झाले असून या कामाची पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी करून प्रकल्पाच्या कामाला गती देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘थोरातांची कमळा’ चित्रपट गाजला, आता ‘विखे-पाटलांची कमळा’ चित्रपट आला व पडला | सामना

News Desk

मुंबईतील दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक, मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत…!

News Desk

शासनाने मागासवर्ग आयोगाचे पुनर्गठन करावे, अन्यथा रोषाला सामोरे जावे लागेल – चंद्रकांत पाटील

News Desk