HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आजचा रायगड जिल्हा दौरा रद्द

मुंबई | निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा दौरा करणार होते. मात्र, मुख्यमंत्र्यांचा आज (१४ जून) होणार दौरा आता रद्द करण्यात आला आहे. या दौऱ्यादरम्यान चक्रीवादळाने बाधित झालेल्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मदत साहित्य आणि अनुदानाचे वाटप करण्यात येणार होते. मुख्यमंत्री रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून चौल, बोर्ली, मुरुड येथे भेट देणार होते. पण, हा दौरा रद्द करण्याचा निर्णय शनिवारी (१३ जून) रात्री उशिरा घेण्यात आला.

सध्या चक्रीवादळामुळे प्रशासन पंचनामे व इतर मदत कार्यात व्यस्त आहे. आपदग्रस्तांना अनुदान वाटप, साहित्य वाटप यापूर्वीच सुरू झाले आहे. हे मदत कार्य अधिक वेगाने होणे महत्त्वाचे असल्याने हा दौरा रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे’, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्ण मुख्यमंत्र्यांनी रायगड जिल्ह्याचा पाहाणी दौरा केला होता. त्यावेळी रायगडसाठी १०० कोटी, रत्नागिरीला ७५ कोटी आणि सिंधुदुर्गला २५ कोटी रुपयांची मदत शासनाने जाहीर केली आहे. नुकसानभरपाईचे निकष बदलण्याची गरज असल्याने तशा सूचना विभागाला दिल्या होत्या, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रासह ५ राज्यांत कोरोना रुग्णांची वाढ, केंद्राने पाठवली आरोग्य पथके

News Desk

कोविडमुळे अनाथ बालकांना अर्थसहाय्य, बालसंगोपनाचा खर्चही सरकार करणार – यशोमती ठाकूर

News Desk

विरोधकांच्या प्रचंड गदारोळात राज्यसभेत मोदी सरकारचे ‘शेती विधेयक’ मंजूर

News Desk