HW News Marathi
Covid-19

कोरोना रुग्णांमध्ये घाट, २४ तासात ४३ हजार ३९३ नवीन कोरोनाबाधित

नवी दिल्ली | कोरोना संबंधित एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या २४ तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत २ हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात ४३ हजार ३९३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात ९११ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट झाल्याने आणि कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

देशात कोरोना रुग्णांमध्ये घट

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३ कोटी ७ लाख ५२ हजार ९५० वर गेला आहे. देशात आतापर्यंत २ कोटी ९८ लाख ८८ हजार २८४ रुग्ण बरे झाले आहेत. तर ४ लाख ५ हजार ९३९ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. ४ लाख ५८ हजार ७२७ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या ३६ कोटी ८९ लाख ९१ हजार २२२ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात २४ तासात नवे रुग्ण – ४३,३९३

देशात २४ तासात डिस्चार्ज – ४४,४५९

देशात २४ तासात मृत्यू – ९११

एकूण रूग्ण – ३,०७,५२,९५०

एकूण डिस्चार्ज – २,९८,८८,२८४

एकूण मृत्यू – ४,०५,९३९

एकूण सक्रिय रुग्ण – ४,५८,७२७

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोणत्याच पक्षाला टोकाची भूमिका घ्यायची गरज नाहीय ! जयंत पाटील

News Desk

…तोपर्यंत मुंबई अनलॉक करणं घातक, पालकमंत्र्यांचं वक्तव्य

News Desk

जम्बो कोव्हीड सेंटरमध्ये सुविधांच्या अभावी १२० कर्मचाऱ्यांचा राजीनामा?

News Desk