मुंबई | अर्थचक्र हे कोरोनाच्या चिखलात रुतले आहे. अर्थचक्र हे फिरले पाहिजे म्हणून काही ठिकाणी मोजक्या स्वरूपात उद्योगधंद्यांना आपण परवानगी देत आहोत .अर्थव्यवस्था ढासळून नये म्हणून काही सवलती देत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये उद्योगाला माफक परवानगी दिली आहे. मात्र, जिल्हाबंदी कायम असेल, पण मालवाहतुकीला परवानगी असेल, असेही स्पष्ट मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. जिल्हाबंदी कायम असेल, कोणत्याही व्यक्तीला दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही, हेही सांगितले आहे. उद्धव ठाकरेंनी आज (१९ एप्रिल) फेसबुक लाईव्हीद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे.
Tomorrow onwards we're starting some financial activities. As we don't run our economy now, we'll be in financial crisis after we come out of Corona crisis. We're starting some business activities in a limited way. Fortunately,several of our dists have zero positive case: Maha CM pic.twitter.com/p6tUws47yj
— ANI (@ANI) April 19, 2020
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सांगितले, कोरोनाविरोद्धच्या लढाईत महाराष्ट्र ६ आठवडा पूर्ण होत आहेत. राज्यात आतापर्यंत ६६ हजार ७९६ टेस्ट झाल्या आहेत. आपण संयम, धैर्य, जिद्दीने लढतोय आहे. मुख्यमंत्र्यांनी उद्योगांना परवानगी देताना म्हणाले, उद्यापासून गणपती बाप्पा मोरया म्हणून हळूहळू सुरुवात करूया, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये माफक प्रमाणात उद्योगांना परवानगी दिली आहे. तुमच्या मजुरांची, कर्मचाऱ्यांची काळजी घेणार असाल तर आम्ही तुम्हाला मदत करु. तसेच जिल्हाबंदी कायमच, मालवाहतुकीला परवानगी दिल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
कोणालाही लक्षणे आढळली तर लपवू नका, तातडीने दवाखान्यात जा. कोरोना झाला म्हणजे सगळे संपले असे नाही. सरकार म्हणून जे जे करणे शक्य आहे ते आम्ही करत आहोत. आतापर्यंत ८० ते ९० टक्के लोकांपर्यंत आम्ही रेशन पोहोचवले आहे. पीपीई किट्सपासून सर्व आवश्यक गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. गेल्या राज्य आणि मुंबई २ ते ३ दिवसांच्या आकड्यांची मी पुनर्तपासणी करणार आहे. आकड्यात चढउतार होतच राहणार, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे
- स्थलांतरित तरुणांनी चिंता करू नये, महाराष्ट्र सरकार तुमची काळजी घेणार, हे दिवस निघून जातील, लढायचे आणि जिंकायचे
- लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात वैफल्य निर्माण होत आहे मदतीसाठी
- मुंबई महापालिका आणि बिर्ला – १८००-१२०-८२००५०
- आदिवासी विभाग- प्रॉजेक्ट मुंबई आणि प्रफुल्ला – १८००- १२०-४०४०
- घरातबुसून कंटाळा आला असेल तर दोन नंबर लिहून घ्या
- घरगुती हिंसा होत असेल तर १०० नंबर फोन करा
- राज्यातील सीमा ३ मेंपर्यंत जिल्ह्यांच्या सीमा बंद आहेत
- नागरिकांनी घराबारे पडू नका, बाहेर पडताना मास्क वापरा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे
- , पेपवर बंदी नाही, पेपर स्टॉल नाही मुंबई – पुण्यात वृत्तपत्रांचे वितरण योग्य नाही
- अँटी करोना पोलीस ही संकल्पना मला आवडली, घरातल्या घरात काळजी घ्या
- पण, जिल्हाबंदी कायम असेल, पण मालवाहतुकीला परवानगी असेल
- यासाठी ऑरेज, ग्रीन आणि रेड झोन आहेत. यासाठी ग्रीन आणि ऑरेंज माफ उद्योगांधद्यांना परवानगी दिली आहे.
- राज्यात काही जिल्हे हे सुदैवाने याठिकाणी कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे हे जिल्हे शून्य आहेत.
- मंजूराची काळजी घेणार असला तर आम्ही सहकार्य करू
- अर्थचक्र हे कोरोनाच्या चिखलात रुतले आहे, अर्थव्यवस्था ढासळून नये म्हणून काही सवलती देत आहेत
- देशातले आकडेवारी कमी होतोय पण म्हणून भ्रमात राहायचे नाही, आकडेवारी खाली आली तर आम्ही गाफील राहू चालणार नाही
- पंतप्रधानांनी लॉकडाऊन वाढवला आहे हे चांगले केले
- ८० ते ९० टक्के लोकांना आम्ही राशन पुरवत आहे
- पीपीई कीटचा तुटवडा आहे आणि आम्ही तो पुरवत आहोत. पीपीई कीटपासून प्रत्येक डॉक्टरांना पुरवत आहे
- कोणालाही सर्दी खोकला असल्याच लपवू नका, कोणतेही लक्ष कृपया लपवू नाका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केला आहे
- कालपासून ते आतापर्यंत महाराष्ट्र ३ हजार ६६ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहे, तर ९५ टक्के निगेटिव्ही आल्या आहेत
- शत्रू समोर दिसत असता, तर एक घाव दोन तुकडे केले असते, पण न दिसणाऱ्या शत्रूशी आपला लढा सुरू आहे
- राज्यात आतापर्यंत ६६ हजार ७९६ टेस्ट झाल्या आहेत
- आपण संयम, धैर्य, जिद्दीने लढतोय आहे
- कोरोनाविरोद्धच्या लढाईत महाराष्ट्र ६ आठवडा पूर्ण होत आहे
- हे युद्ध पाहून लतादीदींच्या सरणार कधी गाण्यांची आठवण झाली
- आपल लक्ष आहे गंभीर लोकांना वाचवायची
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.