HW News Marathi
महाराष्ट्र

TRP घोटाळा – रिपब्लिक चॅनलच्या ३ अधिकाऱ्यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी

मुंबई | न्यूज चॅनल्समधील टीआरपी घोटाळा मुंबई पोलिसांनी उघड केल्यानंतर या प्रकरणाचा तपास जोरदार सुरु झाला आहे. या प्रकरणी काल (११ ऑक्टोबर) दिवसभर मुंबई क्राईम ब्रान्चने रिपब्लिक टीव्ही चॅनलचे विकास खानचंदानी, हर्ष भंडारी यांची मुंबईत तर दमणमध्ये डिस्ट्रिब्यूशन हेड घनश्याम सिंग यांची पोलिसांनी चौकशी केली. या तिघांनाही आज चौकशीसाठी कागदपत्रांसह पोलिसांनी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. CRPC 91 अंतर्गत नोटीस बजावली असून चॅनलला मिळालेल्या जाहिराती, त्यातून मिळालेले उत्पन्न आणि इतर महत्त्वाची कागदपत्र घेऊन चौकशीला हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.

टीआरपी घोटाळा प्रकरणी काल पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही चॅनलचे विकास खानचंदानी यांची ८-९ तास, COO हर्ष भंडारी यांची ६ तास, तर मुंबईत आणि दमण पोलिसांनी डिस्ट्रिब्यूशन हेड घनश्याम सिंग याची ६ तास कसून चौकशी केली आहे. या तिघांनाही टीव्ही जाहिराती संदर्भातले सगळे डॉक्युमेंट्स लवकरात लवकर पोलिसांकडे जमा करण्यासंदर्भात नोटीस जारी केली आहे. जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न, नफा, तोटा यांसंदर्भातला सगळा डाटा रिपब्लिकला पोलिसकडे द्यावा लागणार आहे.

कालच्या चौकशीत टीव्हीवर दिसणाऱ्या कंटेंटशी आमचे देणंघेणं नसून त्यासाठी एडिटोरियल विभाग जबाबदार असतो, अशी माहिती विकास खानचंदानी यांनी दिली आहे. काल रिपब्लिक चॅनेलवर एक शो ऑन एअर करण्यात आला. ज्यामध्ये हंसा नावाच्या कंपनीचा अहवाल आहे. असं सांगून त्या शोमध्ये इंडिया टुडेवर आरोप करण्यात आले आहेत. मात्र हंसा कंपनीने तो अहवाल स्वतःचा नसल्याचं पोलिसांना स्पष्ट केलं आहे. या संदर्भात वेगळी चौकशी पोलिसांकडून करण्यात येणार आहे. आज या शो संदर्भात उत्तर देण्यास विकास खानचंदानी यांनी असमर्थता दर्शवली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान ‘मातोश्री’च्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच असलेल्या चहावाल्याला कोरोनाची लागण

News Desk

‘तो’ निर्णय राज्य सरकारनं घ्यावा – विनोद पाटील

News Desk

कंगना राणावतला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून वाय सुरक्षा

News Desk