HW News Marathi
महाराष्ट्र

तुकाराम मुंढेंनी पीएमपीएमएलच्या १५८ बसचालकांना घरी पाठविले

पुणे – महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पीएमपीएमएलच्या एकूण १५८ बसचालकांना बडतर्फ करून घरी पाठविले आहे. सतत कामावर गैरहजर राहणाऱ्या बसचालकांवर कारवाई करुन वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले. हे बसचालक सलग १५० दिवस कामावर आले नाहीत म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. कारवाई होण्याआधी या सर्वांना नोटीस पाठविण्यात आले होते. तरी देखील हे कामगार कामावर आले नाही.

तुकाराम मुंढे हे २०१६ रोजी नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामा विरोधात धडक कारवाई केल्यामुळे मुंढे चर्चेत आले होते. मुंढे हे कडक शिस्त ,गतिमान प्रशानस आणि पारदर्शी कामसाठी प्रसिद्ध आहेत. यापूर्वी २०१२ मध्ये सोलापूरच्या जालन्यातही ते जिल्ह्यधिकारी म्हणून काम केले होते. मुंढे हे २००५च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“आता सामान्य लोकांनी विमानाचा…” रोहित पवार

News Desk

आ. महेंद्र दळवींच्या नेतृत्वात रायगड जिल्ह्यातील पेण मधील शिवसैनिक शिंदे गटात सामील

News Desk

मराठा समाजाला परीक्षा द्यायला लावून उद्रेकाची वाट पाहू नका – उदयनराजे भोसले

News Desk
महाराष्ट्र

रेल्वेतून चालते विषारी सापांची तस्करी

News Desk

नागपूर | रेल्वेगाड्यांतून चक्क विषारी सापांची तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार विदर्भात उघडकीस आला आहे. दक्षिण एक्स्प्रेसमधून असा एक विषारी साप रेल्वे सुरक्षा दलाने पकडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या सापाच्या विषाची किंमत बाजारात २० लाखांवर असल्याचे विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.

रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेच्या चमूने बुधवारी सायंकाळी ६ वाजता कळमेश्वर ते नागपूरदरम्यान रेल्वेगाडी क्रमांक १२७२२ दक्षिण एक्स्प्रेसमध्ये गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना एका पेटाºयात संशयास्पद वस्तू दिसली. या पेटाºयाबाबत विचारणा केली असता आरोपी सामन हुशयार गोसावी (२४) रा. शंकरगड, अलाहाबाद याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याजवळील पेटारा उघडून पाहिला असता त्यात दोन तोंडाचा साप (मांढळ) असल्याचे निदर्शनास आले. लगेच त्यास पकडून आरपीएफच्या गुन्हे शाखेत आणण्यात आले.

Related posts

वंचित बहुजन आघाडीकडून पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी उमेदवार जाहीर  

News Desk

मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी फडणवीसांचा सरकारला ‘हा’ सल्ला

News Desk

मराठा आरक्षण- सर्वोच न्यायालयात ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे प्रथमच सुनावणी होणार 

News Desk