पुणे | पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयातील महात्मा गांधी यांच्या १५० व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात तुषार गांधींना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र ऐनवेळी कोणतेही कारण न देता हे चर्चासत्र रद्द करण्यात आले. तुषार गांधी यांना निमंत्रित केल्यामुळे आयोजकांना धमकी मिळत असल्यामुळे त्यांना हा कार्यक्रम रद्द केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तुषार गांधी यांच्यासोबत कार्यक्रमासाठी पुणे गांधी भवनचे अन्वर राजन यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. हिंदुत्ववादी संघटनेच्या दबावामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे, असा आरोप अन्वर राजन यांनी केला आहे.
Modern College Pune was forced to cancel a program scheduled for tomorrow celebrating the 150th anniversary of Bapu because they invited me, Patitpavan Sanstha threatened to disrupt the program if I was present. The Goli Maro Gang in Action.
— Tushar (@TusharG) February 6, 2020
प्रोग्रेसिव्ह इज्युकेशन सोसायटीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्यातून ही राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा आयोजित केली आहे. शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस ही कार्यशाळा होणार होती. महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांना या कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. तुषार गांधी यांनी याबाबत एक ट्वीट केले आहे. “गोली मारो गँग इन अॅक्शन, बापूजींच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयातील कार्यक्रमासाठी मला बोलवण्यात आले होते. पण आज सकाळी कार्यक्रम रद्द झाल्याचा दूरध्वनी आला”, असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.