HW News Marathi
महाराष्ट्र

PM, CM, शरद पवारांनाही पत्र लिहिन पण तुम्ही त्यांनी दिलेल्या संधीचा तरी सन्मान करा!

मुंबई । राज्यात कोरोनाचा उद्रेक होत आहे. ५०-६० हजारांच्या रुग्ण आढळत असल्याने राज्यात संचारबंदी लागू केली आहे. या सगळ्या परिस्थितीत मुंडे भावा-बहिणीत ट्विट वॉर सुरु झालं आहे. पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहित बीडमध्ये लसी उपलब्ध करुन देण्याबाबात पत्र लिहिले होते ज्यात त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. मुंडे बहिण भावातील वाद तर सगळ्यांना ठावूकच आहे पण राज्यातील कोरोना परिस्थितीतीवर त्यांच्यात नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

“राज्याच्या भल्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहीन. त्याची दखलही घेतली जाईल. पण तुम्ही त्यांनी दिलेल्या संधीचा तरी सन्मान करा,” असा टोला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी लगवला आहे. बीडमधील कोरोना स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. यामुळे ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर, कोरोना लस यासारख्या वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. यावरुन पंकजा मुंडे आणि सामाजिक मंत्री धनंजय मुंडे यांच्यात ट्वीटरवॉर रंगले आहे.

पंकजा मुंडेंचे नवे ट्वीट

“राज्याच्या भल्यासाठी PM, जिल्ह्याच्या CM आणि पवार साहेबांना ही पत्र लिहीन दखल ही घेतली जाईल! तुम्ही त्यांनी दिलेल्या संधीचा तरी सन्मान करा. तुम्ही बीडमध्ये दमडीही आणली नाही. विमा, विकास निधी, अनुदान काही नाही, माफिया मात्र आणले. जुन्या निधीचे काम तरी करा, उद्घाटन करा हक्क तुम्हाला आहेच भाऊ!” असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे.

 

नेमकं प्रकरण काय?

राज्यात ठिकठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर, कोरोना लस यासारख्या वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना एक पत्र लिहिलं होतं.

“REMDESIVIR चा तुटवडा बीडमध्ये जाणवत आहे, आरोग्य मंत्री यांना विनंती आहे जातीने लक्ष घालून उपलब्ध करून द्यावे. राज्य सरकारला आलेल्या 2 लाख पैकी बीडलाही पुरेसे मिळाले पाहिजेत. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे. जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत,” असे ट्वीट पंकजा मुंडेंनी केले होते. या ट्वीटवरुन त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता.

धनंजय मुंडेंचा पलटवार

यानंतर धनंजय मुंडे यांनीही सलग सहा ट्वीट करत पंकजा मुंडे आणि खासदार प्रितम मुंडेवर टीका केली होती. ताई साहेब, मा. मुख्यमंत्र्यांना व मा. आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र मा. पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल! असेही ट्वीट धनंजय मुंडेंनी केले होते.

जिल्ह्यात लसीकरणाचे दोन्ही कंपन्यांचे मिळून 149473 नागरीकांना पहिले तर 19732 नागरिकांना दुसरे डोस देण्यात आले आहेत.हे प्रमाण अन्य जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत अधिक आहे, हेही आपल्याला ज्ञात नसेलच! राजकारण इतरत्र जरूर करा,पण कृपया जिथे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तिथं नको, असे धनंजय मुंडे म्हणाले.

दरम्यान, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील वाद हा सर्वांना माहित आहेच.. सध्या बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे असल्याने पंकजा मुंडे त्यांवर आगपाखड करताना दिसत आहेत.त्यामुंळे या बहिण भावाच्या वादात बीडला मात्र लस मिळेल का बीडकरांना दिलासा मिळेल का हे पाहणे महत्वाचे असणार आहे..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सगळे खापर केंद्र सरकारवर फोडायचे आणि स्वतः मात्र काही करायचे नाही!, भारती पवारांचे महाविकासआघाडीवर टीकास्त्र

Aprna

अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्यसरकार लवकरच दिलासा देईल -अजित पवार

News Desk

थोर विधीरत्न राम कदमांना केंद्र आणि राज्य सरकारमधला फरकही कळत नाही!

News Desk