HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपच्या १२ आमदारांबाबतच्या निकालावर उर्मिला मातोंडकर आणि केशव उपाध्ये यांच्यात ट्वीटर वॉर

मुंबई | भाजपच्या १२ आमदारांनी विधानसभेत घातलेल्या गोंधळामुळे तालिका अध्यक्षांशी त्यांचं निलंबन केलं होतं. त्यानंतर या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज निर्णय घेण्यात आला असून सर्वोच्च न्यायालयाने त्या १२ आमदारांचं निलंबन रद्द केलं आहे. या निर्णयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ‘आज लोकशाहीचे संरक्षण झाले’ असे ट्विट फडणवीसांनी केले आहे. तर दुसरीकडे आणि बॉलिवूड अभिनेत्री व शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर आणि भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्यातही आरोप-प्रत्यारोपांचा खेळ रंगल्याचे पाहायला मिळाले.

उर्मिला मातोंडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया दिली आहे. या ट्वीटमध्ये मातोंडकर म्हणतात, “अभिनंदन! आनंद आहे ‘लोकशाही’ वाचली याचा…पण अध्यक्ष महोदय याच महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्तीच होत नाही आहे, त्यावरही शेभेकरता का असेना कधीतरी आवाज उठवा. इथे फक्त ५० लाख नाही तर महाराष्ट्राच्या तमाम १२ करोडपेक्षा जास्त जनतेच्या हक्काचा प्रश्न आहे”, असे ट्विट मातोंडकरांनी केले आहे. .यावेळी त्यांच्या पहिल्या ट्वीटमधील शब्द सुधारत त्यांनी पुन्हा टोला लगावलाय. “*शोभेकरता… शोभा पण लाजली वाटतं”‘, असं खोचक टोला मातोंडकरांनी लगावला आहे.

फडणवीसांचे ट्वीट काय?

‘सत्यमेव जयते! राज्य विधिमंडळात ओबीसींच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या भाजपाच्या १२ आमदारांचे बेकायदेशीर निलंबन रद्द ठरविणारा, लोकशाही वाचविणारा आणि ऐतिहासिक निकाल दिल्याबद्दल मा. सर्वोच्च न्यायालयाचे मन:पूर्वक आभार! या निकालाचे आम्ही स्वागत करतो. सातत्याने संविधानाची पायमल्ली करीत तानाशाही पध्दतीने सरकार चालविण्याचा प्रकार मविआ सरकारकडून होत होता, त्याला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली ही जोरदार चपराक. लोकशाहीविरोधी, बेकायदा, अवैध, असमर्थनीय प्रकार लोकशाहीत कधीच खपवून घेतले जात नसतात, आज न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले’.

कृत्रिम बहुमतासाठी निलंबन – फडणवीस 

 

‘हे निलंबन रद्द झाल्याबद्दल भाजपाच्या १२ आमदारांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो! कुठलेही कारण नसताना आणि इतक्या प्रदीर्घ कालावधीसाठी निलंबन हे असंवैधानिक आहे, केवळ कृत्रिम बहुमतासाठी ते करण्यात आले, हे आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो. आज सर्वोच्च न्यायालयाने तेच सांगितले. हा केवळ १२ आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न नव्हता तर त्या मतदारसंघातील ५० लाखाहून अधिक मतदारांचा प्रश्न होता. आज लोकशाहीचे संरक्षण झाले’, अशा शब्दांत फडणवीसांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

उपाध्ययेंची मातोंडकरांवर टीका 

दरम्यान, फडणवीसांच्या याच ट्वीटला मातोंडकरांनी ती प्रतिक्रिया दिली आहे. तर यावर केशव उपाध्ये यांनीही मातोंडकरांवर निशाणा साधत वडाची साल पिंपळाला लावू नका, अशी टीका केली आहे. उपाध्ये म्हणाले, “थोडी माहिती घ्या. आपलं वाचन चांगल आहे असं ऐकून आहे. दोन्ही विषय पूर्णपणे वेगळे आहेत. उगाच वडाची साल पिंपळाला लाऊ नका. आमदारांना सर्व कायदे नियम धाब्यावर बसवून निलंबित करण्यात आले होते. राहिला तुमच्या आमदाकीचा विषय, तर त्यासाठी लोक न्यायालयात गेली होती, पण न्यायालयाने काही सांगितलं नाही.”

“आपला तो बाब्या”

त्यानंतर मातोंडकरांनी उपाध्ये यांना प्रत्युत्तर देताना असं म्हंटलं की, “अर्थातच विषय पुर्णतः वेगळे आहेत म्हणूनच “आनंद/अभिनंदन”. पण प्रश्न मात्र महाराष्ट्राच्या जनतेच्या हक्कांचा आहे आणि लोकशाहीचा तर आहेच आहे. त्यामुळे “वडाची साल” ऐवजी “आपला तो बाब्या” जास्त बरोबर आहे. माझ्या आमदारकीची चिंता नसावी. त्याने माझे काम थांबलेले नाही”, असं मातोंडकर म्हणाल्या.

मातोंडकरांच्या या टीकेवर पुन्हा उपाध्ये यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “आपली जळजळ, तळमळ ही केवळ ‘आमदारकी’साठीच आहे, हे आपल्या ट्वीटवरून लक्षात येतेच. महाराष्ट्रात एवढे गंभीर विषय घडत असताना, आपण त्यावर फारसे भाष्य केलेले दिसत नाही. पण आमदारकीचा विषय आला, की आपल्यातील ‘प्रतिक्रियावादी’ भूमिका सगळे काही स्पष्ट करते. बाकी आमदारकीसाठी शुभेच्छा”, असं उपाध्ये यांनी म्हंटलंय.

यानंतर पुन्हा एकदा मातोंडकरांनी भाजपावर निशाणा साधलाय. “गेली २ वर्ष ‘जळजळ,तळमळ’ आणि ‘जळफळाट’ हे शब्द कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत हे महाराष्ट्राच्या सुज्ञ जनतेला माहित आहे. मुद्दा सोडून बोलण्यात तथ्य नसतं. मुद्दा लोकशाहीचा, लोकहिताचा आहे. बाकी माझ्या जळजळीकरता अँटासिड (Antacid) आहे. आपण आपला विचार करा,” असा टोला मातोंडकरांनी लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अपघाताला कारणीभूत ठरणारे ब्लॅक स्पॉट तातडीने दूर करावेत! – मुख्यमंत्री

Aprna

“आता राज्यातील सर्व गुन्ह्यांची उकल ‘NIA’ने करावी का?”; भाजपचा सरकारला सवाल

News Desk

नांदेड, परभणी जिल्ह्यातील गारपीटग्रस्त भागांची अशोक चव्हाणांकडून पाहणी

News Desk