वर्धा | पुलगावतील लष्करी तळावर आज (२० नोव्हेंबर)ला भीषण स्फोट झाला आहे. जुनी स्फोटके निकामी करताना हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. देवळी तालुक्यातील सोनगावबाई गावाजवळ पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास बॉम्ब निकामी करण्यासाठी घेऊन गेले होते. परंतु हा बॉम्ब निकामी करताना पेटी हातातून पडल्यामुळे हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे.
While carrying out demolition of old explosives by the staff of Ordnance factory Khamaria,Jabalpur at the demolition land in Pulgaon there was an accident. In the incident 3 labourers & 1 staff of ordnance lost lives: BB Pande, Defence PRO Nagpur on Pulgaon explosion #Maharashtra
— ANI (@ANI) November 20, 2018
#UPDATE: Death toll rises to 4 and 11 injured in Pulgaon Army depot explosion in Wardha. #Maharashtra https://t.co/Okot4lrLsP
— ANI (@ANI) November 20, 2018
या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. या स्फोटात मृताचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
#SpotVisuals: Two killed, several injured in an explosion in Pulgaon Army depot in Wardha. Further details awaited. #Maharashtra pic.twitter.com/9hHbsBXLbO
— ANI (@ANI) November 20, 2018
Two killed, several injured in an explosion in Pulgaon Army depot in Wardha. #Maharashtra pic.twitter.com/ZJywxHe3h1
— ANI (@ANI) November 20, 2018
जखमींवर सावंगी रुग्णालयात रुपचार सुरू आहेत. जबलपूर येथील दारुगोळा भांडारातील माल या ठिकाणी निकामी करण्यासाठी आणले होते. हा स्फोट निष्काळजीपणामुळे घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या परिसरातील १५ किमीपर्यंत हादरे जाणवले आहेत. दुर्घटना घडल्यानंतर काही काळातच या ठिकाणचा दारूगोळा दुसर्या ठिकाणी हलवण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.