HW News Marathi
क्राइम

“हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं, भाजपासहित सर्वांची…”, उदयनराजे

सातारा | राज्यात विधानसभा निवडणुकांच्याही पूर्वीपासून केंद्रीय तपास यंत्रणांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातल्या काही नेत्यांचा तपास सुरू केला आहे. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, अनिल परब अशा अनेक नेत्यांची चौकशी सध्या ईडी, आयकर विभाग किंवा सीबीआय करत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपाकडून राजकारणासाठी वापर होत असल्याची तक्रार विरोधकांकडून केली जात असताना भाजपाकडून मात्र हा आरोप सातत्याने फेटाळून लावला जात आहे. दरम्यान भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी आता यावर भाष्य केलं असून ईडीने हिंमत असेल तर आपल्याकडे यावं असं म्हटलं आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.

ईडीच्या कारवाईवर भाष्य करताना भाजपालाही घरचा आहेर दिला

एकमेकांचं झाकायचं आणि सोयीप्रमाणे काढायचं अशा शब्दांत त्यांनी भाजपासहित इतर पक्षांवरही टीका केली. ईडी आपल्याकडे आली तर सर्वांचीच यादी देतो असंही ते यावेळी म्हणाले. राज्यात सध्या महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांविरोधात ईडीची कारवाई सुरु आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. उदयनराजे भोसले यांनी ईडीच्या कारवाईवर भाष्य करताना भाजपालाही घरचा आहेर दिला आहे.दरम्यान कधीकाळी काँग्रेसचे एक प्रमुख नेते असलेले हर्षवर्धन पाटील भाजपामध्ये गेल्यानंतर त्यांनी केलेलं एक विधान चर्चेत आलं आहे. या विधानामुळे विरोधकांना आयतंच कोलीत मिळाल्याचं बोललं जात आहे. एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी आलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी आपण भाजपामध्ये आल्यानंतर काय बदल घडला, याविषयी मिश्किल टिप्पणी केली.

“जसं आपण पेरतो तसं उगवतो. आमच्या मागे ईडी नाही…ज्यांनी वाईट केलं आहे त्यांच्याच मागे का लागले आहेत. हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं. पुराव्यासकट मी ईडीला यादी देईन,” असं उदयनराजे यावेळी म्हणाले. यावेळी त्यांना ईडीच्या कारवाईमागे भाजपाचं षडयंत्र असल्याच्या आरोपाविषयी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “कोणीही असू दे मी सर्वांची यादी देतो. एकमेकांच झाकायचं आणि सोयीप्रमाणे एकमेकांचं काढतात. बास झालं आता राजकारण”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बायपास सर्जरीनंतर सचिन वाझेनी 3 महिने घरात नजरबंद ठेवण्याची केली मागणी

News Desk

गार्डसोबत होते बायकोचे अनैतिकसंबंध , पतीने असे काही केले..

News Desk

एकवीरा देवीचा सव्वा लाखाचा कळस चोरीला

News Desk