नवी दिल्ली | राजधानी दिल्लीत आज (२२ जुलै) राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. यावेळी भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले आणि डॉ. भागवत कराड, शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी, काँग्रेसकडून राजीव सातव यांनी आपल्या खासदारकीची शपथ घेतली. उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीत खासदारकीची घेऊन त्यानंतर “जय भवानी जय शिवाजी”ची घोषणा दिली. तर प्रियंका चतुर्वेदी, राजीव सातव, भागवत कराड यांनी मराठीतून आपल्या राजसभेच्या खासदारकीची शपथ घेतली.
राष्ट्रवादीकडून राजसभेच्या नवनिर्वाचित खासदार म्हणून फौजिया खान यांची निवड करण्यात आली होती. मात्र, काहीच दिवसांपासून फौजिया खान यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्या उपस्थित राहू शकलेल्या नाहीत. महाराष्ट्रातून मार्च महिन्यात राज्यसभेच्या खासदार पदासाठी ७ जणांची नियुक्ती झाली होती. मात्र, कोरोनामुळे हा शपथविधी पुढे ढकलला गेला. दरम्यान, या ७ जणांपैकी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे पुन्हा एकदा राज्यसभा खासदारकीची शपथ घेणार आहेत.
https://www.facebook.com/watch/?v=289480922334567
महाराष्ट्राचे ७ खासदार
- उदयनराजे भोसले – भाजप
- भागवत कराड – भाजप
- रामदास आठवले – भाजप पुरस्कृत
- प्रियांका चतुर्वेदी – शिवसेना
- शरद पवार – राष्ट्रवादी
- फौजिया खान – राष्ट्रवादी
- राजीव सातव – काँग्रेस
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.