HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप खासदार उदयनराजे भोसले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला

मुंबई | भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. या भेटीचं नेमकं कारण समजू शकलं नाही. मात्र, मराठा आरक्षणासंदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत आहे. मराठा समाज आक्रमक झाला आहे. उदयनराजे भोसले हे आज कृष्णकुंजवर पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे काही सहकारी आहेत. या दोन्ही नेत्यांच्या भेटीचं कारण समजू शकलेलं नाही. मात्र, मराठा आरक्षण आणि राज्यातील राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने या दोन्ही नेत्यांमध्ये खलबत होण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच उदयनराजे भोसले हे राज ठाकरे यांना भेटत असल्याने या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती. आणि मराठा आरक्षणासंदर्भात पावले उचलण्याची विनंतीही केली होती. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही वारंवार मराठा आरक्षणासंदर्भात पावले उचलण्याचे आवाहन केले जात आहे. आणि आता त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला आल्यामुळे आता मराठा आरक्षण प्रकरणात काय होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पूजाने आई-वडिलांचं ऐकलं असतं तर…”, पूजा चव्हाणच्या आजी-आजोबांची प्रतिक्रिया

News Desk

बीड जिल्ह्याला कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेसाठी ११ कोटी ८ लाख रुपये निधी वितरित !

swarit

‘गोसीखुर्द’च्या पाण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निर्देश

Aprna