HW News Marathi
महाराष्ट्र

उदयनराजे भोसले यांनी ‘या’ कारणासाठी घेतली शिवेंद्रराजे भोसले यांची भेट

सातारा | सध्या साताऱ्यात राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. साताऱ्यातील राजकीय घडामोडी काही केल्या थांबण्याचं नाव घेईनात. आज (२२ फेब्रुवारी) अचानकपणे खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या असून नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रराजे यांची भेट घेतल्याने साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहे. परंतु उदयनराजेंच्या एका नातेवाईकाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी ते स्वत: शिवेंद्रराजेंना भेटल्याची माहिती मिळत आहे.

उदयनराजे यांचे मामा नाशिकमध्ये असतात. त्यांच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी म्हणजेच उदयनराजेंच्या मामे भावाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी उदयनराजे हे शिवेंद्रराजे यांच्या सुरुची या निवासस्थानी गेले होते. या दरम्यान दोघांमध्ये कोणतीही चर्चा झाली नसून केवळ आमंत्रण देऊनच उदयनराजे तिथून निघाले असल्याची माहिती आहे.

उदयनराजे भोसले-शंभूराज देसाई भेट

एकीकडे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची राष्ट्रवादीशी जवळीक वाढत असताना, साताऱ्यात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे दिलजमाईचे संकेत आहेत. त्यानंतर शिवजयंतदिनी उदयनराजे भोसले यांनी शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. उदयनराजे भोसले हे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय खलबते रंगली.

उदयनराजेंच्या भेटीगाठी

उदयनराजे भोसले हे गेल्या काही दिवसांपासून दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मराठा आरक्षण प्रश्नासंदर्भात उदयनराजेंनी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेतल्या होत्या. मात्र, आजची शिवेंद्रराजे यांची भेट ही कोणत्याही राजकीय हेतूची नव्हती असे समजत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पीएमजीपी वसाहतीतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा निर्णय येत्या महिनाभरात! -मंत्री जितेंद्र आव्हाड

Aprna

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विटरने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

News Desk

राज्यापाल भेटवर अजित पवारांचा विनोत तावडेंना टोला

News Desk