HW News Marathi
महाराष्ट्र

आज होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या बैठकीला उदयनराजेंनी फिरवली पाठ

मुंबई | आज (७ ऑक्टोबर) मराठा समाजाच्या तसेच राजकीय वर्तुळात माथाडी भवनात होणाऱ्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कारण उदयनराजे आणि संभाजीराजे पहिल्या वेळेसच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्र येणार होते. पण आज होणाऱ्या या महत्त्वाच्या बैठकीसाठी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे येणार नसल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी आज नवी मुंबई इथे बोलावलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीकडे उदयनराजे उपस्थित राहणार नाही आहेत.मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थिगिती मिळाल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. अशात राज्यात होणारी एमपीएससी परीक्षेला तूर्तास स्थगिती द्यावी आणि पोलीस भरतीदेखील थांबवावी अशी मागणी जोर धरत आहे.

मराठा आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण समाज आक्रमक झाला आहे. दरम्यान, आज होणारी बैठक महत्वाची असणार होती. आज नवी मुंबईत माथाडी समाजाची बैठक होणार आहे. या बेठकीला छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे उपस्थित राहणार होते. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या बैठकीकडे होते. पण आता उदयनराजे यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. एकाच मंचावर हे दोघे उपस्थित राहणार असल्यानं नवी मुंबईमध्ये होणारी बैठक मराठा समाजाच्या दृष्टीने महत्वाची मानली जात होती. दोन्ही राजेंनी जर एकत्र निर्णय घेतला तर तो निर्णय मराठा समाजासाठी शेवटचा असतो. त्यामुळे मराठा आरक्षणच्या मुद्द्याला गती मिळेल असा दावा माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केला होता. पण आता उदयनराजेंच्या अनुपस्थितीतच बैठक पार पडणार असल्याने या काय निर्णय घेण्यात येतो हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मलिकांच्या प्रकरणांचं सर्व पुरावे शरद पवारांकडे देणार!; फडणवीसांचा इशारा

Gauri Tilekar

मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांचे एका महिन्याचे वेतन पुरग्रस्तांच्या मदतीसाठी

News Desk

मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी सर्वोच्च प्राधान्य देऊ! – देवेंद्र फडणवीस

Aprna