HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

२१ ऑगस्टपासून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

मुंबई । राज्यात मुसळधार पावसामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत निर्माण झालेली भीषण पूरस्थिती आता हळूहळू आटोक्यात येण्यास सुरूवात झाली आहे. या भागांतील पुराचे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, राज्यातील भीषण पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्भव ठाकरे येत्या २१ आणि २२ ऑगस्टला या पूरग्रस्त भागाचा दौरा करतील. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे देखील उपस्थित असतील. त्याचप्रमाणे, यावेळी कोल्हापूरमधील अन्य महत्त्वाचे नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार देखील उपस्थित असतील. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली आहे.

राज्यात भीषण पूरस्थिती असताना शिवसेना नेते एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, प्रताप सरनाईक, धैर्यशील माने आपल्या कार्यकर्त्यांसह या पूरग्रस्त भागात काम करत होते. दरम्यान, त्यापूर्वी शिवसेनेवर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली होती. राज्य पूरस्थितीचा सामना करत असताना मातोश्रीवर मात्र विधानसभेच्या दृष्टीने पक्षप्रवेशांचे सत्र सुरूच होते. त्यामुळे, सर्व स्तरातून शिवसेनेवर टीका झाली. त्यानंतर आता काहीच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण आदित्य ठाकरेंसोबत पूरग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याचे सांगण्यात आले.

Related posts

लोकशाहीचे हे जिवंत रूप मानायचे की बेबंद लोकशाहीचे?

News Desk

इटलीत बसून चर्चेत राहण्यासाठी ‘त्या’ कायदा सुव्यवस्थेवर बोलत आहेत !

News Desk

गांधी घराण्याबाहेरच्या कार्यकर्त्याला पक्षाचा अध्यक्ष करा !

News Desk