HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे

मुंबई | महाराष्ट्रच्या मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. उद्धव ठाकरेंनी आज (२८ नोव्हेंबर) शिवतीर्थावर हजारो लोकांच्या साक्षीने हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. राज्यात पहिल्यांदाच महाविकासआघाडीच्या नावाने नवे समीकरण राज्याला पाहायला मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या रुपाने पहिला ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहे.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई तर राष्ट्रवादीतर्फे जयंत पाटील आणि छगन भुजबळ तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत शपथ घेतली आहे. यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते उद्धव ठाकरे यांचे बंधू मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सहकुटुंब आले होते.

विधानसभा निडणुकीचा निकाल लागल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी महिनाभर संघर्ष सुरू होता. यानंतर अखेर महाविकासआघाडीचे उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व करणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, कपिल सिब्बल, मल्लिकार्जुन खर्गे, अभिषेक मनु सिंघवी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, द्रमुक नेते एम. स्टॅलिन, टी. आर. बालू, काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उद्योगपती मुकेश अंबानी, निता अंबानी आदी मान्यवर उपस्थित होते.

या शपथविधी सोहळ्यानंतर ‘महाराष्ट्र विकास आघाडी’ सरकारची पहिली कॅबिनेट बैठक सुद्धा आजच होणार आहे. ही कॅबिनेट बैठक रात्री आठ वाजताच्या सुमारास सह्याद्री गेस्ट हाऊस येथे होणार आहे. या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अशी घेतली उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ

“छत्रपती शिवजी महाराजांना वंदन करून, आणि माझ्या आई-वडीलांना स्मरण करून, मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल श्रद्धा व खरी निष्ठा बाळगीन, मी भारताची. सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन, मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कृपाशंकर सिंह भाजप मध्ये का आले?’ फडणवीसांनी सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगितलं!

News Desk

आषाढी एकादशी निमित्त नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी टाळ, मृदुंगाच्या तालात धरला ठेका!

News Desk

नारायण राणेंनी सिंधुदुर्ग येथे एमएसएमई-तंत्रज्ञान केंद्राच्या स्थापनेची केली घोषणा

News Desk